Congress MP : अधिवेशनाआधी काँग्रेसला दिलासा, अतिदक्षता विभागात दाखल झालेल्या खासदाराला रुग्णालयातून डिस्चार्ज; सोमवारी संसदेत येणार?

Congress MP K Sudhakaran Hospitalised in Dubai ICU : लोकसभेच्या अधिवेशनाआधी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून काँग्रेस खासदाराची प्रकृती अचानक खालवल्याने दुबईतील रुग्णालयात हलवण्यात आले होते.
Congress
CongressSarkarnama
Published on: 
Updated on: 

News Delhi News : लोकसभेत सोमवारी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर चर्चा होऊन मतदान होणार आहे. या महत्त्वपूर्ण घडामोडीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप आणि विरोधकांकडून जोरदार राजकीय तयारी सुरू आहे. विधेयकाच्या विरोधात विरोधकांची मोट बांधण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी सक्रिय झाले आहेत. एकीकडे ते विरोधकांशी संपर्क करत असतानाच काँग्रेस खासदार के. सुधाकरन यांना अचानक दुबईतील रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले होते. त्यामुळे मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरील महत्त्वपूर्ण चर्चेला आणि मतदानाला ते उपस्थित राहू शकतील का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यांच्या प्रकृतीमुळे काँग्रेसला धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.

मात्र, आता काँग्रेससाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. के. सुधाकरन यांना दुबईतील रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून ते लवकरच दिल्लीला रवाना होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत निर्माण झालेली चिंता काही प्रमाणात दूर झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी स्वतःच्या जोखमीवर डिस्चार्ज मिळवला असून ते संसदेत उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

नेमकं काय घडलं?

के. सुधाकरन यांचे पुत्र संजोग यांनी वडिलांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी सुधाकरन नियमित आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात गेले होते. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना काही न्यूरोलॉजिकल समस्या असल्याचे सांगितले. त्यामुळे पुढील ४८ तास वैद्यकीय देखरेखीखाली राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. शनिवारी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे रविवारी त्यांना डिस्चार्ज मिळेल आणि ते घरी परततील, अशी कुटुंबीयांना अपेक्षा होती. मात्र, रविवारी दिल्लीला परतण्याची तयारी सुरू असतानाच त्यांना अचानक ICU मध्ये हलवण्यात आल्याचे संजोग यांनी सांगितले.

Congress
Congress Setback : हिंगोलीत राजकीय उलथापालथ! काँग्रेसला धक्का, 40 वर्षांपासून निष्ठावंत असलेल्या ज्येष्ठ नेत्याची ठाकरेंच्या शिवसेनेत एन्ट्री

कुटुंबीयांना भेटण्यासही मनाई; मुलाचा गंभीर आरोप

सुधाकरन यांना ICU मध्ये हलवल्यानंतर कुटुंबीयांना त्यांची भेट घेण्याची परवानगी देण्यात आली नसल्याचा आरोप त्यांच्या मुलाने केला आहे. रुग्णालयातील डॉक्टरांनी वरिष्ठांकडून फोन आल्याचे सांगितल्याचा दावाही संजोग यांनी केला. या प्रकारामुळे वडिलांच्या उपचारांमध्ये कोणाचा दबाव किंवा राजकीय हस्तक्षेप आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

केरळ काँग्रेसकडूनही चिंता व्यक्त

या घटनेची माहिती समोर आल्यानंतर केरळ काँग्रेसमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सनी जोसेफ यांनी खासदाराच्या कुटुंबीयांना त्यांची भेट घेण्यापासून रोखणे ही गंभीर बाब असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल यांनीही सुधाकरन यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांनी सुधाकरन यांचे पुत्र संजोग यांच्याशी चर्चा केली.

पक्ष नेतृत्वाशी मतभेद असल्याचीही चर्चा

के. सुधाकरन हे २०२१ ते २०२४ या कालावधीत केरळ प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते. अलीकडच्या काळात पक्षातील नेतृत्वाशी त्यांचे मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. कन्नूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा होती. मात्र, पक्षाच्या निर्णयामुळे त्यांना माघार घ्यावी लागल्याचे सांगितले जाते.

Congress
Congress News : ‘मिनी विधानसभा’ निवडणुकीत भाजपला मोठा धक्का! सभापती पाठोपाठ उपसभापती निवडीत काँग्रेसचा मोठा विजय; जिंकल्या 257 जागा

एकीकडे मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर महत्त्वपूर्ण मतदान होणार असताना दुसरीकडे काँग्रेस खासदार के. सुधाकरन यांच्या प्रकृतीबाबतची बातमी समोर आली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि इंडिया आघाडीची चिंता वाढली आहे. सुधाकरन यांच्या प्रकृतीत पुढे काय सुधारणा होते, तसेच त्यांच्या मुलाने केलेल्या आरोपांबाबत काय स्पष्टीकरण समोर येते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.