

Maharashtra Politics : राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, पक्षांमधील प्रवेश आणि राजकीय समीकरणांच्या बदलामुळे अनेक ठिकाणी नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. डिलिमिटेशन अर्थात मतदारसंघ पुनर्रचनेच्या विधेयकावरून देशभरातील राजकीय पक्षांमध्ये मतभेद असतानाच महाराष्ट्रात ठाकरे गटाच्या शिवसेनेला मोठी राजकीय ताकद मिळण्याची शक्यता आहे. हिंगोलीतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जॅकी उस्मान कुरेशी पक्षाला रामराम करून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
गेल्या तीन दशकांपासून काँग्रेसमध्ये सक्रिय असलेल्या जॅकी कुरेशी यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आज मुंबईतील मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश होणार असल्याची माहिती आहे. या पक्षप्रवेशामुळे हिंगोली जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कळमनुरी, औंढा नागनाथ आणि आखाडा बाळापूर परिसरात जॅकी कुरेशी यांचा मोठा जनसंपर्क असल्याचे सांगितले जाते. स्थानिक राजकारणात सक्रिय असलेल्या कुरेशी यांच्या पक्षांतराची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. पक्षातील नाराजीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. आता कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश करून ते नव्या राजकीय वाटचालीला सुरुवात करणार आहेत.
साताऱ्यात महेश शिंदे गटाला धक्का?
दुसरीकडे, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मतदारसंघातही राजकीय घडामोडी घडल्या आहेत. आमदार महेश शिंदे यांच्या निकटवर्तीयांपैकी मानले जाणारे शिवथर येथील आकाश साबळे आणि पैलवान सचिन शेलार यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.