Rahul Gandhi News : राहुल गांधींनी केंद्रीय मंत्री असलेल्या जुन्या दोस्ताला तोंडावरच म्हटले गद्दार; मैत्रीचा हात पुढे केला पण...

Rahul Gandhi & Ravneet Singh Bittu clash : विरोधकांकडून आज आंदोलनादरम्यान भारत आणि अमेरिकेतील व्यापार करारावरून सरकारला घेरले.
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Parliament protest Congress MPs : संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत सलग तिसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमधील सामना पाहायला मिळाला. विरोधकांकडून आज संसदेच्या पायऱ्यांवर माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकातील मजकुरावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात घोषणाबाजी केली. विरोधी पक्षनेते राहुल गांधीही यावेळी उपस्थित होते.

लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना राहुल गांधी नरवणे यांच्या पुस्तकातील मजकुरावरून प्रचंड आक्रमक झाले होते. मात्र, सत्ताधाऱ्यांनी त्यावर वारंवार आक्षेप घेतल्याने त्यांना आपले भाषण पूर्ण करता आले नाही. आजही याच मुद्द्यावरून त्यांचा पवित्रा आक्रमक होता, हे त्यांच्या आजच्या कृतीवरून स्पष्टपणे दिसून आले.

संसदेच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन सुरू असतानाच त्याठिकाणी केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू दाखल झाले. त्यांना पाहून राहुल गांधींनी थेट त्यांचा उल्लेख गद्दार असा केला. राहुल गांधी म्हणाले, ‘पाहा, एक गद्दार इथून जात आहे. त्यांचा चेहरा पाहा.’ त्यानंतर राहुल यांनी बिट्टू यांच्याशी हात मिळविण्याचा प्रयत्न करताना ‘नमस्ते भाई, माझ्या गद्दार दोस्ता. चिंता करू नका, तुम्ही परत (काँग्रेसमध्ये) याल,’ असे म्हटले.

Rahul Gandhi
Top 10 News : तटकरेंच्या सूचक इशाऱ्याने राष्ट्रवादीत खळबळ, पवारांचा फडणवीसांवर निशाणा, राणेंचं मंत्रिपद धोक्यात?... वाचा महत्वाच्या घडामोडी

राहुल यांच्या या विधानावर बिट्टूही संतापले. राहुल यांच्याशी हात न मिळवताच त्यांनी काढता पाय घेतला. यावेळी त्यांना राहुल यांच्याकडे पाहत देशाचे दुश्मन असे त्यांना म्हटले. अशा लोकांसोबत आपण कोणतेही संबंध ठेवत नाही, असे म्हणत बिट्टू तिथून संसदेत निघून गेले. दोघांमधील संभाषणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे. बिट्टू हे आधी काँग्रेसमध्येच होते. लोकसभा निवडणुकीआधी ते भाजपमध्ये गेले. पण त्यांचा पराभव झाला. त्यानंतरही त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळाले.

Rahul Gandhi
Local body election Punjab : हायकोर्टाकडून 100 हून अधिक नगरपरिषदांच्या निवडणुकांना स्थगिती; नेमकं काय घडलं?

दरम्यान, विरोधकांकडून आज आंदोलनादरम्यान भारत आणि अमेरिकेतील व्यापार करारावरून सरकारला घेरले. संसदेतही केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडून व्यापार करारावर निवेदन केले जात असताना विरोधकांना जोरदार घोषणाबाजी केली. या गदारोळातच गोयल यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज दोन वाजेपर्यंत स्थगित केले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच सभागृहात विरोधकांकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com