Delhi student protest : दिल्लीत लाठीचार्जमध्ये जखमी झालेली विद्यार्थिनी व्हेंटिलेटरवर; नड्डा, राहुल गांधींची रुग्णालयात धाव...

Rahul Gandhi, JP Nadda : आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर देशभरात त्यावरून रोष वाढला आहे. त्यानंतर सरकारला खडबडून जाग आली आहे.
Delhi student protest
Delhi student protestSarkarnama
Published on
Updated on

Delhi lathi-charge update : दिल्लीतील जंतरमंतर याठिकाणी सुरू असलेल्या क्रॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन आता अधिक तीव्र होऊ लागले आहे. सोमवारी संसद मार्चदरम्यान झालेल्या हिंसाचारामध्ये काही विद्यार्थी व तरूण जखमी झाले असून त्यांच्यावर दिल्लीतील आरएमएल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी एक २१ वर्षीय तरूणी पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये गंभीर जखमी झाली असून ती व्हेंटिलेटरवर आहे.

दिल्लीतील मोर्चादरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला. यामध्ये पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला होता. तर काही आंदोलकांनी पोलिसांची वाहने फोडली, दगडफेक झाल्याचे व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. आंदोलकांप्रमाणेच काही पोलिसही या संघर्षामध्ये जखमी झाले आहे.

लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या २१ वर्षीय तरूणीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सीजेपीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दीपके यांनी दिली होती. त्यांनी रुग्णालयात जाऊन या तरूणीच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. याच रुग्णालयात इतर जखमी झालेल्या आंदोलकांवरही उपचार सुरू आहेत. नेमके हे आंदोलक किती, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Delhi student protest
Shiv Sena UBT : ओमराजेंसह 6 खासदारांना विलीनीकरण भोवणार? अधिवेशन सुरू असतानाच ठाकरेंची 'सुप्रीम' चाल...

नड्डा, राहुल गांधी भेटीला

आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर देशभरात त्यावरून रोष वाढला आहे. त्यानंतर सरकारला खडबडून जाग आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी मंगळवारी सकाळी आरएमएल रुग्णालयात जाऊन जखमी आंदोलकांची विचारपूस केली. त्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही रुग्णालयात धाव घेत जखमी आंदोलकांना आधार दिला.

Delhi student protest
CJP Delhi protest : दिल्लीतील हिंसाचार खटकला; मोदी सरकारमधील मंत्रीही 'सरकारी' भूमिकेविरोधात पहिल्यांदाच थेट बोलले...

व्हेंटिलेटरवर असलेल्या २१ वर्षीय तरुणीच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे 'एएनआय'च्या वृत्तात म्हटले आहे. या तरुणीच्या प्रकृतीत अशीच सुधारणा होत राहिल्यास व्हेंटिलेटर काढण्याचा विचार डॉक्टर करत असल्याचेही या वृत्तात म्हटले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी जंतरमंतरवर जाऊन अभिजित दीपके यांची भेट घेत आंदोलनाना पाठिंबा दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com