Delhi Metro Seat Dispute : दिल्ली मेट्रोतील मारहाणीत एकाचा मृत्यू, निवृत्त IAS अधिकारी अन् मुलाला अटक; नेमकं काय घडलं?

A seat dispute Delhi Metro turned fatal, leading arrest retired IAS officer and his son : आईच्या तक्रारीनुसार आसनावरून वादानंतर मारहाण झाल्याचा आरोप; वैद्यकीय अहवालात जखमांची नोंद.
Delhi Metro Seat Dispute
Delhi Metro Seat DisputeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Delhi Metro passenger safety : दिल्ली मेट्रोमधील ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव असलेल्या आसनावरून झालेला वाद अन् त्यातून पुढे झालेल्या मारहाणीतून पवन शर्मा (वय 48) यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी निवृत्त IAS अधिकारी संजय प्रताप सिंह (वय 65) आणि त्यांचा मुलगा सिद्धार्थ सिंह (वय 36) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दिल्लीतील सर्वोच्च न्यायालय मेट्रो स्टेशनवर शुक्रवारी (ता.9) झाली.

फिर्यादीनुसार, पवन शर्मा हे त्यांच्या वृद्ध आईसोबत गुरुग्रामहून दिल्लीकडे प्रवास करत होते. प्रवासादरम्यान दोघेही ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव असलेल्या आसनांवर बसले होते. पुढे सर्वोच्च न्यायालय मेट्रो स्टेशनवर पोहोचल्यानंतर दोन व्यक्ती डब्यात चढल्या. त्यापैकी एक वयस्कर, तर दुसरा तरुण होता. निवृत्त IAS अधिकारी संजय प्रताप सिंह आणि त्यांचा मुलगा सिद्धार्थ सिंह ही ते दोघे होते.

या दोघांनी दुर्गा शर्मा आणि पवन शर्मा यांच्याशी उद्धटपणे बोलत, आसनांवरून उठवले. उद्धटपणाच्या भाषेवर पवन शर्मा यांनी या दोघांना सुनावले. यातून दोघांमध्ये वाद उफळला. यातून पवन शर्मा यांना मारहाण (Crime) सुरू झाली. पवन यांनी मारहाणीला विरोध सुरू केल्यावर सिद्धार्थ सिंह याने पवन यांची मान पकडून मारहाण सुरू केली.

Delhi Metro Seat Dispute
Karnataka Congress : कर्नाटक काँग्रेसला मोठा धक्का? 25 आमदार भाजपच्या संपर्कात; विजयेंद्रांचा दावा

पवन शर्मा यांना सिद्धार्थ सिंह याने चांगलीच मारहाण केली. पवन शर्मा यांना तोंडावर, मानेवर आणि छातीवर मारहाण केली. मुलाला मारहाण होत असल्याचे पाहून आई दुर्गा शर्मा यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला. मात्र, त्याच वेळी संजय प्रताप सिंह यांनी त्यांचा हात पकडून ठेवत, दाबून धरले. यामुळे मुलाला वाचवता आले नाही, असे तक्रारीत म्हटले आहे.

Delhi Metro Seat Dispute
Anil Bonde On Rahul Gandhi : ‘राहुल गांधींची नौटंकी सुरूच राहिली तर…’; अनिल बोंडे यांचा घणाघात

या मारहाणीनंतर पवन शर्मा मेट्रोच्या डब्यात जमिनीवर कोसळले आणि बेशुद्ध झाले. प्रवासी आणि मेट्रो कर्मचाऱ्यांच्या मदतीने लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी पवन शर्मा यांची तपासणी करत, त्यांना मृत घोषित केले, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

पवन शर्मा यांच्या वैद्यकीय अहवालात (MLC) त्यांच्या उजव्या गालावर मारहाणीच्या अनेक लहान जखमांच्या आढळून आल्या आहेत. मानेजवळील छातीवर मार लागल्याच्या खुणा आणि उजव्या हाताच्या अंगठ्यावर खरचटलेली जखम आढळली आहे. पवन शर्मा रुग्णालयात दाखल झाले तेव्हा ते बेशुद्ध होते आणि ते कोणताही प्रतिसाद देत नव्हते, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com