Delimitation Bill: इंडिया आघाडीच्या बैठकीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार राहणार अनुपस्थित?

INDIA Alliance Meeting on Delimitation Bill:डिलिमिटेशन विधेयकावर INDIA आघाडीची आज बैठक; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अनुपस्थित राहणार, पक्षाची भूमिका काय?
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on: 
Updated on: 

Delhi Political News: डिलिमिटेशन विधेयकावरून विरोधकांमध्ये एकमत घडवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच आज (28 नोव्हेंबर) दिल्लीत INDIA आघाडीतील घटक पक्षांची महत्त्वाची बैठक होणार आहे.

संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत विरोधकांची पुढील रणनीती ठरवली जाण्याची शक्यता आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा एकही खासदार बैठकीस उपस्थित राहणार नसल्याचे वृत्त साम टिव्हीने दिले आहे. यावरुन महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी सकाळी 11.30 वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. डिलिमिटेशन विधेयकासंदर्भात केंद्र सरकारच्या संभाव्य भूमिकेला विरोधकांनी कसे उत्तर द्यायचे, तसेच संसदेच्या विशेष अधिवेशनात कोणती भूमिका घ्यायची, यावर बैठकीत चर्चा होणार आहे. INDIA आघाडीतील पक्षांसह काही इतर विरोधी पक्षांनाही या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

शरद पवार रुग्णालयात; सुप्रिया सुळे मुंबईत

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे आहेत. त्या सध्या मुंबईतच राहणार असून, संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी सोमवारी दिल्लीला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठकातील उपस्थिती नेमकी कशी असेल, हे स्पष्ट होणे बाकी आहे. खासदार निलेश लंके, आणि भास्कर भगरे हे उपस्थित राहणार असल्याची यापूर्वी माहिती समोर आली होती, पण लंके आणि हे भगरे हे सध्या राज्यातच आहेत. पक्षाकडून बैठकीला कोण प्रतिनिधित्व करणार, याबाबतही उत्सुकता आहे.

Sharad Pawar
Maharashtra Schools: शाळेतच मिळणार रोजगाराभिमुख शिक्षण! राज्यातील 227 शाळांबाबत सरकारचा मोठा निर्णय

डिलिमिटेशन विधेयकावरून पक्षाची भूमिका चर्चेत

डिलिमिटेशन विधेयकावरून INDIA आघाडीतील पक्षांमध्ये मतभेद असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने विधेयकाचा मसुदा तपासल्यानंतरच अंतिम भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी यापूर्वी सांगितले आहे. पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी विधेयकाला पाठिंबा दर्शविल्याने या भूमिकेवरूनही राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

अशा पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर विरोधक एकत्रित भूमिका मांडणार की प्रत्येक पक्षाची भूमिका वेगळी राहणार, हे बैठकीनंतर स्पष्ट होईल.

Sharad Pawar
Congress: 'गद्दारांची मांदियाळी असताना..' राहुल गांधींनी शरद पवारांचा हात घट्ट पकडलेला फोटो व्हायरल; डिलिमिटेशनवरून काँग्रेसचा व्हिडिओ

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.