Maharashtra Schools: शाळेतच मिळणार रोजगाराभिमुख शिक्षण! राज्यातील 227 शाळांबाबत सरकारचा मोठा निर्णय

Ratan Tata Maharashtra State Skills University: महाराष्ट्रातील 227 शाळांमध्ये 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून व्यावसायिक शिक्षणाचे अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहेत. रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकडे या उपक्रमाच्या अंमलबजावणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
Ratan Tata Maharashtra State Skills University
Ratan Tata Maharashtra State Skills UniversitySarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra Government GR: शालेय शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख कौशल्यांचे प्रशिक्षण मिळावे, या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील 227 शाळांमध्ये आता व्यावसायिक शिक्षणाचे अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहेत.

विशेष म्हणजे, या अभ्यासक्रमांच्या अंमलबजावणीची जबाबदारी रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, मुंबई यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाने नुकताच निर्णय घेतला आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये शालेय स्तरापासूनच विद्यार्थ्यांना व्यावसायिक आणि कौशल्याधारित शिक्षण देण्यावर भर देण्यात आला आहे. याच धोरणाच्या अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये विविध व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्याची प्रक्रिया राबवली जात आहे. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि रोजगारासाठी आवश्यक कौशल्ये मिळावीत, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे.

970 शाळांना मंजुरी; 227 शाळांसाठी नवी व्यवस्था

केंद्र सरकारच्या प्रकल्प मान्यता मंडळाने (PAB) महाराष्ट्रातील एकूण 970 शाळांमध्ये व्यावसायिक शिक्षणाचे अभ्यासक्रम राबविण्यास यापूर्वीच मान्यता दिली आहे. त्यापैकी काही शाळांचे वाटप व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांना करण्यात आले आहे. त्यानंतर उर्वरित 227 शाळांमध्ये 2026-27 या शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Ratan Tata Maharashtra State Skills University
Teacher Recruitment: शिक्षक भरतीच्या उमेदवारांना मोठा दिलासा! मुलाखतींची मुदत वाढली; आता 12 डिसेंबरपर्यंत संधी

या पार्श्वभूमीवर रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाने शालेय विद्यार्थ्यांना दर्जेदार व्यावसायिक शिक्षण उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. या प्रस्तावाला मान्यता देत संबंधित 227 शाळांमध्ये विद्यापीठामार्फत अभ्यासक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Ratan Tata Maharashtra State Skills University
School Assessment: मुख्याध्यापकांनो, तयारी ठेवा! राज्यातील 540 शाळांचे त्रयस्थ मूल्यांकन होणार; 60 दिवसांची डेडलाइन

प्रशिक्षणासोबत प्रत्यक्ष कामाचा अनुभवही मिळणार

या उपक्रमात विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक शिक्षणापुरते मर्यादित ठेवले जाणार नाही. अभ्यासक्रमाच्या स्वरूपानुसार प्रत्यक्ष प्रशिक्षण, मिश्र पद्धतीचे (Hybrid) शिक्षण आणि अनुभवाधारित शिक्षणाची व्यवस्था करावी लागणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव (Industry Exposure), कामाच्या ठिकाणी प्रशिक्षण (On-the-Job Training) आणि इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी विद्यापीठावर असेल.

Ratan Tata Maharashtra State Skills University
CET Exam: पहिल्या परीक्षेत कमी गुण मिळाले? चिंता नको! वर्षातून दोनदा CET देण्याची संधी; पहिली सीईटी अनिवार्य, दुसरी ऐच्छिक

यासाठी आवश्यक पात्र प्रशिक्षक, विषयतज्ज्ञ आणि इतर मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षाही निश्चित केलेल्या अभ्यासक्रमानुसार घेतल्या जातील. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय कौशल्य पात्रता आराखडा (NSQF) आणि संबंधित सक्षम प्राधिकरणाच्या निकषांनुसार प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

Ratan Tata Maharashtra State Skills University
Teacher News: शिक्षकांचा 1 डिसेंबरपासून 'डिजिटल असहकार'! प्रशासकीय WhatsApp ग्रुप सोडणार; ऑनलाइन कामांनाही नकार

शाळांची यादी जाहीर होणार

या 227 शाळांमध्ये उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद स्वतंत्र कार्यादेश काढणार आहे. त्यामध्ये संबंधित शाळांची यादी, मंजूर विषय, प्रशिक्षणाचे स्वरूप, विद्यार्थ्यांची संख्या, आवश्यक मनुष्यबळ आणि अपेक्षित शैक्षणिक निष्पत्ती यांचा समावेश असेल.

Ratan Tata Maharashtra State Skills University
Graduate Teachers Salary: न्यायालयाच्या निकालानंतर S-14 वेतनश्रेणी लागू झाल्यास शिक्षकांचा पगार किती? हातात मिळणार 60 हजार!

उपक्रमासाठी होणारा खर्च समग्र शिक्षा आणि पीएमश्री अंतर्गत मंजूर निधीतून, PAB ने निश्चित केलेल्या मर्यादेतच केला जाणार आहे. मंजूर तरतुदींपेक्षा अधिक खर्च करता येणार नाही. तसेच विद्यापीठाला उपक्रमाच्या प्रगतीचे अहवाल शिक्षण परिषदेला सादर करावे लागतील.

विद्यार्थ्यांचा सहभाग, प्रशिक्षणाचा दर्जा, उपलब्ध साधनसामग्री आणि मूल्यमापनाचे निष्कर्ष यांचा आढावा घेतल्यानंतर पुढील टप्प्यात या उपक्रमात सहभागी शाळांची संख्या वाढविण्याबाबत स्वतंत्र निर्णय घेतला जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.