Dharmendra Pradhan News: 'भारतात सत्तापरिवर्तन केवळ...'; मंत्रिपद गमावल्यानंतर धर्मेंद्र प्रधानांचा 'CJP'वर पहिलाच थेट वार

CJP Protest: माजी शिक्षणमंत्री आणि भाजप नेते धर्मेंद्र प्रधान यांनी शुक्रवारी(ता.16 ऑक्टोबर) सोशल मीडियावरील X प्लॅट फॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी कॉक्रोच जनता पार्टी,अभिजीत दिपकेंचं आंदोलन, काँग्रेस, राहुल गांधी यांच्यासह विरोधकांच्याही आंदोलनावरुन टीकेची झोड उठवली आहे.
Dharmendra Pradhan
Dharmendra PradhanSarkarnama
Published on: 
Updated on: 

New Delhi News: कॉक्रोच जनता पार्टीनं देशातील नीटसह इतर मुख्य परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणामुळे आक्रमक भूमिका घेत दिल्लीतील जंतर मंतर वर ऐतिहासिक आंदोलन पुकारलं होतं. सीजेपीच्या या आंदोलनानंतर अखेर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आंदोलनामुळे मोदी सरकारवर 12 वर्षांच्या सत्ताकाळात एखाद्या मंत्र्‍याचा राजीनामा घेण्याची ही पहिलीच वेळ होती.आता शिक्षणमंत्री पद गमावल्यानंतर धर्मेंद्र प्रधानांनी 'सीजेपी'वर पहिलं भाष्य केलं आहे

माजी शिक्षणमंत्री आणि भाजप नेते धर्मेंद्र प्रधान यांनी शुक्रवारी(ता.16 ऑक्टोबर) सोशल मीडियावरील X प्लॅट फॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी कॉक्रोच जनता पार्टी,अभिजीत दिपकेंचं आंदोलन, काँग्रेस, राहुल गांधी यांच्यासह विरोधकांच्याही आंदोलनावरुन टीकेची झोड उठवली आहे.

धर्मेंद्र प्रधानांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून आपला संताप बाहेर काढला आहे.पोस्टमध्ये ते म्हणतात, देशहित, व्यवस्था सुधारण्याचे दावे आणि विद्यार्थ्यांच्या हिताच्या नावाखाली सुरू झालेल्या विरोधी आंदोलनाचे खरे स्वरूप आता कोणापासूनही लपून राहिलेले नाही. उघडपणे ‘Regime Change’ अर्थात सत्ताबदल आणि बांगलादेशातून प्रेरणा घेण्याची भाषा करणे, हे स्पष्ट करते की विद्यार्थ्यांच्या आडून देशात केवळ अराजकता पसरवण्याचे आणि राजकीय व्यवस्था अस्थिर करण्याचे हे एक सुनियोजित षडयंत्र असल्याचा दावा केला आहे.

तसेच प्रधानांनी या पोस्टमधून परकीय शक्तींच्या बळावर सत्तेची स्वप्ने पाहणाऱ्या या देशविरोधी लोकांनी हे लक्षात घ्यावे की, भारतात सत्तापरिवर्तन केवळ लोकशाही प्रक्रियेद्वारेच ठरते. त्यामुळे भारतातील जनता ही अलोकतांत्रिक विचारसरणी कधीही स्वीकारणार नसल्याचं सांगत विरोधकांना फटकारलं आहे.

Dharmendra Pradhan
ShivsenaUBT News: निवडणुकीच्या तोंडावरच एकनाथ शिंदेंचा आदित्य ठाकरेंना 'दे धक्का'; जवळचाच नेता फोडला, ठाण्यात धनुष्यबाण घेतला हाती

धर्मेंद्र प्रधानांनी यावेळी संसदेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनाही डिवचलं आहे. पराभवाचे शतक पूर्ण केलेले विरोधी पक्षनेते @RahulGandhi वारंवार जनतेच्या जनादेशाचा अपमान करतात. निवडणूक प्रक्रियेतून मनासारखा निकाल न मिळाल्यास लोकशाही संस्थांबद्दल अविश्वास निर्माण करण्याचा @INCIndia चा प्रयत्न आणि राजकीय स्वार्थासाठी वारंवार जनतेला त्रास देणे,हाच त्यांचा नेहमीचा उद्देश राहिला असल्याचा हल्लाबोलही राहुल गांधींवर केला आहे.

ही त्याच लोकशाहीविरोधी काँग्रेसी मानसिकतेची झलक आहे, ज्या मानसिकतेने देशवासीयांचे अधिकार पायदळी तुडवले होते.हातात संविधान घेऊन फिरणाऱ्या, पण संविधानविरोधी भूमिका घेणाऱ्या राहुल गांधींना जनतेने वारंवार नाकारले असल्याचं खोचक टोलाही प्रधानांनी लगावला आहे.

Dharmendra Pradhan
Dasara Melava 2026: महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट, शेतकरी संकटात..? यंदा दसरा मेळावे होणार का? राजकारणी काय भूमिका घेणार?

मात्र, तरीही सत्तेच्या लालसेपोटी आपल्या हट्टाला बळी पडून जनादेशाचा अपमान करणे आणि घटनात्मक संस्थांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून लोकशाहीच्या मर्यादा पायदळी तुडवणे सुरूच असल्याचं भाजप नेते धर्मेंद्र प्रधान यांनी पोस्टमधून म्हटलं आहे. राहुल गांधीजी, लोकशाही बद्दलचा तुमचा हा द्वेषपूर्ण दृष्टिकोन अत्यंत लाजिरवाणा आहे असल्याचं सांगत प्रधानांनी त्यांना टार्गेट केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com