

Modi Government news : केंद्र सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बांग्लादेशातील भारताचे उच्चायुक्त दिनेश त्रिवेदी यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. मागील काही वर्षांत पहिल्यांदाच एखाद्या उच्चायुक्तांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आल्याचे सांगितले आहे. भारत आणि बांग्लादेश या दोन्ही देशातील संबंधांचे महत्व अधोरेखित करण्यासाठी हा धोरणात्मक निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.
केंद्रीय गृहखात्याने याबाबतचा कार्यालयीन आदेश जारी केला आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकी दरम्यान त्रिवेदी यांच्या उच्चायुक्तपदाच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब झाले होते. ते मुळचे बंगालचे असून यूपीए सरकारच्या काळात केंद्रात मंत्रीही होते. तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांनी अनेक वर्षे ममता बॅनर्जी यांची साथ दिली होती. काही वर्षांपूर्वीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
नेमका काय आहे आदेश?
गृहखात्याच्या आदेशानुसार, केंद्र सरकारने ढाका येथील भारताचे उच्चायुक्त दिनेश त्रिवेदी यांना यांना शासकीय कार्यक्रमांसाठी (Ceremonial) केंद्रीय मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्र्यांच्या समकक्ष प्रोटोकॉलचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. हा दर्जा केवळ त्रिवेदी यांच्या वैयक्तिक प्रोटोकॉलपुरताच मर्यादित असेल. सरकारच्या अधिकृत अधिकृत प्राधान्यक्रम यादीमध्ये (Table of Precedence) कोणताही बदल होणार नाही. म्हणजेच हा दर्जा केवळ त्रिवेदी यांच्यापुरताच राहणार आहे.
Table of Precedence म्हणजे शासकीय समारंभांमध्ये संविधानिक पदाधिकारी, मंत्री, न्यायाधीश, राजनीतिक अधिकारी आणि वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांचा पदाच्या ज्येष्ठतेनुसार क्रम ठरवणारी अधिकृत यादी असते. सध्याच्या प्रोटोकॉलनुसार, केंद्रीय मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री हे या यादीत वरच्या स्थानावर असतात, तर राजदूत आणि उच्चायुक्त यांना तुलनेने खालचा क्रम दिला जातो. या संरचनेत सरकारने कोणताही बदल केलेला नाही. केवळ दिनेश त्रिवेदी यांनाच कॅबिनेट मंत्र्यांच्या समकक्ष दर्जा देऊन दुतावासाचे महत्व वाढविले आहे.
दरम्यान, सरकारच्या हा निर्णय परराष्ट्र धोरणाच्या अनुषंगाने महत्वाचा मानला जात आहे. हा निर्णय बांग्लादेशातील भारतीय दूतावासाचे वाढते राजकीय महत्त्व आणि भारत-बांगलादेश संबंध अधित दृढ करण्यासाठी भारतीय प्रतिनिधींची वाढती धोरणात्मक भूमिका दर्शविणारा मानला जात आहे. मोदी सरकारकडून बांगलादेशासोबतच्या संबंधांना परराष्ट्र धोरणात महत्त्वाचे स्थान देत जात असल्याचाही एक राजनीतिक संदेश आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.