Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प बनले बिहारचे रहिवासी! अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या नावे आला अर्ज; प्रशासनं शॉकमध्ये

Donald Trump: बिहारच्या समस्तीपुरा जिल्ह्यात हा अजब प्रकार घडला असून ज्यानं प्रशासनाला गोंधळात टाकलं आहे. एका व्यक्तीनं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या नावे निवडणूक यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज केला आहे.
Donald Trump
Donald Trump
Published on
Updated on

Donald Trump: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सध्या सुरु असलेल्या स्पेशल इन्टेन्सिव्ह रिव्ह्यूमुळं अर्थात मतदारयाद्या अपडेट करण्याचं काम सुरु आहे. यावरुन उलटसुलट चर्चा सुरु असताना तसंच आरोप-प्रत्यारोप होत असताना आणखी एक गंभीर आणि अजब प्रकार समोर आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावानं एका व्यक्तीनं मतदार अर्ज दाखल केला आहे. हा अर्ज प्राप्त झाल्यानं प्रशासनाचीही झोप उडाली. पण नेमकं काय घडलं?

Donald Trump
Telangana Reservation: तेलंगाणानं काढला 42 टक्के ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश! राज्यपालांनी रोखलं; सत्ताधारी काँग्रेसनं घेतला मोठा निर्णय

बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातील मोहिउद्दीननगर प्रखंड कार्यालयात हा प्रकार समोर आला आहे. यामुळं प्रशासनं गोंधळात बुचकाळ्यात पडलं आहे. कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटो आणि नावानं एका व्यक्तीनं रहिवासी दाखल्यासाठी ऑनलाईन अर्ज केला आहे. हा अर्ज आणि त्यावरील फोटो पाहिल्यानंतर प्रशासनाची झोप उडाली आणि त्यांनी याप्रकरणाची चौकशी सुरु केली. हा खोडसाळपणाचा प्रकार असल्याचं लक्षात येताच ट्रम्पच्या नावाचा अर्ज प्रशासनानं बाद केला. यानंतर आता सायबर कायद्यानुसार यामध्ये एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

Donald Trump
Bacchu Kadu: राज ठाकरे बच्चू कडूंसोबत शेतकरी यात्रेत सहभागी होणार? दोघांच्या भेटीत कुठल्या विषयांवर झाली चर्चा? जाणून घ्या

अर्जाची पूर्ण घटना अशी

मोहिउद्दीननगरच्या लोकसेवा केंद्रात २९ जुलै २०२५ रोजी ऑनलाईन अर्ज (BRCCO/2025/17989735) रहिवाशी दाखल्यासाठी प्राप्त झाला. आश्चर्याची बाब म्हणजे यात अर्जदाराचं नाव डोनाल्ड जॉन ट्रम्प असं लिहिण्यात आलं होतं. या अर्जसोबत एक फोटोही जोडला होता, हो फोटो देखील डोनाल्ड ट्रम्प यांचाच होता. तर घराचा पत्ता म्हणून हसनपूर गाव, वॉर्ड क्रमांक १३, मुक्काम पोस्ट बाकरपूर, मोहिउद्दीननगर, जिल्हा. समस्तीपूर असा दिला आहे. त्याचबरोबर एक ई-मेल आयडी देखील यात आहे.

Donald Trump
Mohan Bhagvat: "धर्मासाठी अनेकांनी बलिदान दिलं मृतांचे ढीग लागले पण..."; मोहन भागवतांनी धर्माला दिली गुरुत्वाकर्षणाची उपमा

चौकशीत बनावट असल्याचं उघड

या अर्जाची ब्लॉक डेव्हलपमेंट अधिकारी डॉ. नवकंज कुमार आणि अंचलाधिकारी बृजेशकुमार द्विवेदी यांनी संयुक्त प्रेसनोट काढून याची संखोल चौकशी केली. चौकशीअंती हे समोर आलं की, फोटो, आधार क्रमांक, बारकोड आणि पत्त्यासोबत छेडछाड करण्यात आली आहे. हा अर्ज खोटा असल्याचं निष्पण्ण झालं. त्यानंतर ४ ऑगस्ट २०२५ रोजी महसूल अधिकारी सृष्टी सागर यांनी औपचारिकरित्या हा अर्ज फेटाळून लावला. अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, सध्या बिहारमध्ये सुरु असलेल्या स्पेशल इन्टेन्सिव्ह रिव्ह्यूच्या कार्यक्रमात अडथळे आणण्यासाठी आणि याची खिल्ली उडवण्याचा हा प्रकार आहे.

Donald Trump
Radhanagari Politics : महायुतीत फूट! पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातच महायुतीचा डाव फसणार; के. पी पाटलांच्या संकेताने गणित बिघडणार!

जनतेला आवाहन

यानंतर प्रसासनानं सामान्य जनतेला आवाहन केलं आहे की, लोकसेवा केंद्रांचा आणि सरकारी पोर्टल्सचा अशा प्रकारे दुरुपयोग केला जाता कामा नये. अशा प्रकारचा खोडसाळपणा संसाधनाच्या नुकसानीला कारणीभूत ठरतात. तर गरजवंतांना यापासून वंचित राहावं लागतं. तसंच प्रशासनानं हे देखील स्पष्ट केलं आहे की, सरकारी सेवांमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी तांत्रिकबाबींची पडताळणी अधिक सक्षम केली जाईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com