E20 Petrol: आता इथेनॉल पेटलं! "जनतेच्या तक्रारी सरकार ऐकून घेईना" केजरीवालांनी थेट पंतप्रधानांच्या घरासमोर ठिय्या; दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई

E20 petrol protest by Arvind Kejriwal: देशभरात पेट्रोलमध्ये होत असलेल्या इथेनॉल ब्लेंडिंगविरोधात आता दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे रस्त्यावर उतरले आहेत.
Rahul Gandhi, Arvind Kejriwal
Rahul Gandhi, Arvind KejriwalSarkarnama
Published on
Updated on

Ethanol-blended petrol controversy: देशभरात पेट्रोलमध्ये होत असलेल्या इथेनॉल ब्लेंडिंगविरोधात आता दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे रस्त्यावर उतरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर त्यांनी आम आदमी पार्टीच्या सहकाऱ्यांसह ठिय्या आंदोलन केलं. सुमारे १०० समर्थकांसह ते पंतप्रधानांच्या निवासस्थानावर मोर्चा घेऊन गेले. यावेळी त्यांनी पेट्रोलमध्ये इथेनॉलविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Rahul Gandhi, Arvind Kejriwal
Satara DCC Bank : सातारा जिल्हा बँक निवडणूक तापली : बाळासाहेब पाटील यांच्या प्रभावक्षेत्रात भाजप आमदार मनोज घोरपडेंची बाजी

केजरीवालांची मागणी काय?

केजरीवाल यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं की, "आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडं ही मागणी करतो आहोत की, त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावात येऊ नये, त्यामुळं भारतीयांवर E20 पेट्रोल-इथेनॉल ब्लेंडिंगचा कार्यक्रम थोपवू नये" यावेळी आंदोलनात आपचे वरिष्ठ नेते मनिष सिसोदिया, राज्यसभा खासदार संजय सिंह हे देखील उपस्थित होते. यावेळी संजय सिंह यांनी जोरदार घोषणाबाजी केली. 'ट्रम्प यांची गुलामी करणं बंद करा'... 'ट्रम्प यांचे गुलाम कुठे सापडतील? भाजपच्या कार्यालयात!'.... 'पेट्रोल चोर कुठे सापडतील? भाजपच्या कार्यालयात'.... 'तेल चोर कुठे सापडतील? भाजपच्या कार्यालयात'... 'सगळे चोर कुठे सापडतील? भाजपच्या कार्यालयात'... अशी घोषणाबाजी यावेळी संजय सिंह यांनी पंतप्रधानांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन करताना दिल्या.

पोलिसांची कारवाई

दरम्यान, पंतप्रधानांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन करणाऱ्या केजरीवाल यांच्यासह खासदार संजय सिंह यांच्यासह मनिष सिसोदिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांना पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसून जवळच्या पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. यानंतर या ठिकाणी या आंदोलकांवर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

Rahul Gandhi, Arvind Kejriwal
Sharad Pawar : गेल्या महिन्यात शरद पवारांची घेतली भेट ; जळगावच्या नेत्याचा दोन्ही राष्ट्रवादींबाबत खळबळजनक दावा, पुणे-मुंबईतील घडामोडींतून लावला अंदाज

नेमका विषय काय?

देशात सध्या पेट्रोलमध्ये इथेनॉल ब्लेंडिंगचा प्रयोग सुरु आहे. खुद्द मोदी सरकारनं सुप्रीम कोर्टात याबाबत माहिती देताना हा प्रयोग सुरु असल्याचं म्हटलं आहे. ८० टक्के पेट्रोल अन् २० टक्के इथेनॉल या प्रमाणात सध्या हे ब्लेंडिंग सुरु आहे.

यामुळं पेट्रोलची बचत करण्याचा आणि ऊसाच्या मळीपासून तयार केलेल्या पर्यावरणपुरक इथेनॉलचा इंधन म्हणून वापर वाढवण्याचा यामागे उद्देश आहे. यामुळं पेट्रोलचा वापर कमी होऊन त्याची आयातही कमी होईल त्यामुळं सरकारचा मोठा पैसा वाचेल असा यामागं सरकारकडून युक्तीवाद केला जात आहे. तसंच इथेनॉल निर्मिला चालना मिळून नवी बाजारपेठ देशात तयार होऊन नवे रोजगारही तयार होतील असंही सरकारकडून सांगितलं जात आहे.

विशेष म्हणजे भविष्यात हेच ब्लेंडिंगच प्रमाण ८० टक्के इथेनॉल अन् २० टक्के पेट्रोल असं करण्याचा मानसही सरकारनं बोलून दाखवला आहे. पण त्यासाठी इथेनॉलचा सपोर्ट करतील अशी गाड्यांची इंजिन विकसित करावी लागणार आहेत.

सध्याच्या २०२३ पूर्वीच्या गाड्यांचे इंजिन हे E10 ला सपोर्ट करणारे असल्यानं अनेक गाड्यांमध्ये इथेनॉलमुळं इंजिन खराब होत असल्याचं आणि ते काम काढत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत. यामुळं मायलेजही कमी झाल्याच्या तक्रारी आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com