ED asset seizure 81000 crore : धडाकेबाज 'ED'! मालमत्ता जप्तीचा विक्रम, पण अटक का थंडावल्या?

Despite massive asset seizures worth ₹81,000 crore by the Enforcement Directorate in financial fraud cases last year, arrest actions have seen a noticeable decline : सक्तवसुली संचलनालयाकडून आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात गेल्या आर्थिक वर्षात तब्बल 81 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता जप्ती केली.
ED asset seizure 81000 crore
ED asset seizure 81000 croreSarkarnama
Published on
Updated on

Enforcement Directorate action : सक्तवसुली संचलनालयाकडून (ED) आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात गेल्या आर्थिक वर्षात तब्बल 81 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता जप्ती केली. 'ED'ची आतापर्यंत मालमत्ता जप्तीची ही उच्चांकी कारवाई ठरली आहे. मात्र अटकेच्या कारवायांमध्ये 27 टक्के घट झाली आहे.

दरम्यान, 'ED'च्या कारवायांमध्ये एकतर्फीपणा असतो, सत्ताधारी विरोधकांच्या विरोधात 'ED'चा वापर करत असल्याचे सातत्याने आरोप होतात. देशातील पाच राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, विशेष करून पश्चिम बंगालमध्ये 'ED'ची छापेमारीवर विरोधकांनी लक्ष केलं होतं.

आर्थिक गैरव्यवहार (Corruption) प्रकरणामध्ये कारवाई करण्याचे ‘ED’ला अधिकार असून, त्यातून या संस्थेकडून देशभरात कारवाई करण्यात येते. ‘ED’कडून 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये 2892 कारवाया केल्या असून, 2024-25च्या तुलनेमध्ये या कारवायांची संख्या दुप्पट आहे.

‘ED’कडून पुराव्यावर आधारित तपास करण्यात येत असून, त्यावरच लक्ष केंद्रित केल्यामुळे अटकेचे प्रमाण कमी झाले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ‘ईडी’कडून 2023-24 मध्ये 272, 2024-25 मध्ये 214 आणि 2025-26 मध्ये 156 जणांना अटक झाली होती.

ED asset seizure 81000 crore
Indurikar Maharaj daughter wedding : “काय बोंबलायचं ते बोंबला!” टीकांना झुगारत इंदुरीकर महाराजांच्या कन्येचा शाही विवाह चर्चेचा केंद्रबिंदू

‘ED’ने 2024-25 मध्ये 1491, तर 2025-26 मध्ये 2892 एवढे छापे घातला. गेल्या आर्थिक वर्षात सर्वाधित दुप्पट छापे घातले. आर्थिक फसवणुकीतील पीडितांची मालमत्ता परत करण्याचे लक्ष्य 15 हजार कोटी रुपयांचे ठेवण्यात आले होते. प्रत्यक्षात 32,678 कोटी रुपयांच्या मालमत्ता परत करण्यात आल्या.

ED asset seizure 81000 crore
Ashok Kharat Case : भोंदूंचा खेळ खल्लास! अशोक खरात प्रकरणानंतर राज्यभरात मोठी कारवाई, 15 आरोपींवर गुन्हे

यामध्ये मोठ्या परताव्यांची आमिषे दाखविणाऱ्या योजनांच्या प्रकरणांमध्ये मोठे यश मिळाल्यामुळे हा आकडा वाढला आहे. याआधी 2024-25मध्ये 15,582 कोटी रुपयांच्या मालमत्ता परत करण्यात आल्या होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com