Rajya Sabha election : राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराची घोषणा; सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत नाव जाहीर...

NCP political update : राष्ट्रीय अधिवेशनात सुनेत्रा पवार यांचे भाषण झाल्यानंतर राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी उमेदवाराचे नाव जाहीर केले.
Praful Patel, Ajit Pawar, Sunetra Pawar
Praful Patel, Ajit Pawar, Sunetra PawarSarkarnama
Published on
Updated on

NCP Rajya Sabha candidate : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. मागील काही दिवसांपासून याबाबत चर्चा सुरू होती. अखेर आज त्यावर शिक्कामोर्तब झाले. त्याचप्रमाणे सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीतच आज राज्यसभेच्या आगामी निवडणुकीसाठी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचीही घोषणा करण्यात आली.

राष्ट्रीय अधिवेशनात सुनेत्रा पवार यांचे भाषण झाल्यानंतर राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी उमेदवाराचे नाव जाहीर केले. पार्थ पवार हे राज्यसभेचे उमेदवार असतील, असे पटेल यांनी जाहीर केले. काल कोअर कमिटीच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पटेल यांनी यावेळी दिली.

महाराष्ट्रात सात जागांसाठी १६ मार्च रोजी राज्यसभेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी ३ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. रिक्त होत असलेल्या सात जागांपैकी चार जागा भाजपच्या तर प्रत्येक एक जागा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीच्या वाट्याला येणार आहे.

Praful Patel, Ajit Pawar, Sunetra Pawar
Supreme Court : मोठी घडामोड : मोदी सरकारची सुप्रीम कोर्टात बिनशर्त माफी, ‘त्या’ दोन व्यक्ती मंत्रालयात कधीच दिसणार नाहीत...

मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येणाऱ्या जागेसाठी पार्थ पवार यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता होती. सुनेत्रा पवार या राज्याच्या उपमुख्यमंत्री बनल्याने त्यांना राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यामुळे पार्थ पवार यांना राज्यसभेत पाठविले जाऊ शकते, अशी चर्चा होती.

Praful Patel, Ajit Pawar, Sunetra Pawar
Devendra Fadnavis : क्लीप द्या, ‘त्या’ मंत्र्यांचा प्रस्ताव राज्यपालांकडेच पाठवतो; विधानसभेत CM फडणवीसांचा गर्भित इशारा, मंत्र्यांची धडधड वाढली...

आज पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात प्रफुल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी मांडला. त्याला सर्वानुमते मंजुरी दिली. आजपासून सुनेत्रा पर्व सुरू झाल्याचे पक्षाच्या नेत्यांनी आपल्या भाषणादरम्यान सांगितले. तसेच सुनेत्रा पवार यांनीही आपल्या भाषणात अध्यक्षपद स्वीकारताना अजितदादांची सर्व अर्धवट राहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी पक्षासोबत ताकदीने उभे राहणार असल्याची भावना व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com