MP Election News : गॅस सिलिंडर ४५० रुपयांना, विद्यार्थ्यांना लॅपटॉप-स्कूटी ; निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांची घोषणा!

MP Election News : 'निवडणुक येताच सिलिंडर झाला स्वस्त..."
MP Election
MP Election Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Madhya Pradesh News : मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असताना मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मोठी घोषणा केली आहे. खरगोन येथे जनआशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री चौहान यांनी निवडणुकांच्या अनुषंगाने राज्यातील जनतेला मोठा दिलासा दिला आहे. चौहान म्हणाले, "केवळ उज्ज्वला योजनेतील लोकांनाच नाही तर या योजनेत नसलेल्या लोकांनाही नेहमी 450 रुपयांना घरगुती गॅस सिलिंडर मिळणार आहे." यामुळे आता निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने आता शेवटचा डाव टाकल्याचे बोलले जात आहे. (Latest Marathi News)

मध्ये प्रदेशात भाजपची जनआशीर्वाद यात्रा शनिवारी जिल्ह्यातील बारव विधानसभेत पोहोचली होती. यावेळी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही या यात्रेत सहभाग घेतला. येथे मुख्यमंत्र्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यानंतर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय, खरगोनचे खासदार गजेंद्र सिंह पटेल, खंडवाचे खासदार ज्ञानेश्वर पाटील, बरवाहचे आमदार सचिन बिर्ला आणि इतर अनेक नेत्यांनीही रथावर स्वार होऊन रोड शो केला.

MP Election
G-20 New Delhi summit : 'नवी दिल्ली लीडर्स घोषणापत्रा'ला मंजुरी; भारताचे महत्त्वपूर्ण पाऊल !

'प्रत्येक शाळेतील तीन मुलांना स्कूटी' -

मुख्यमंत्री म्हणाले की, "मुख्यमंत्री आवास योजना, पंतप्रधान आवास योजनेपासून वंचित राहिलेल्या लोकांना लाभ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. तसेच ६० टक्के गुण मिळविणाऱ्या मुला-मुलींना लॅपटॉप दिले जातील. प्रत्येक शाळेतील तीन मुलांना स्कूटीही दिली जाणार आहे."

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com