Gautam Adani : गौतम अदानींना सर्वात मोठा दिलासा! अमेरिकन कोर्टाकडून अखेर 'तो' खटला कायमचा बंद

Gautam Adani Group Legal Victory : अमेरिकेच्या न्याय विभागाने फौजदारी आरोपपत्र मागे घेण्यासाठी केलेल्या अर्जाला जिल्हा न्या. निकोलस गारॉफिस यांनी मंजुरी दिली. मात्र, खटला मागे घेण्यामागील कारणांबाबत न्यायालयाने न्याय विभागाकडून अतिरिक्त स्पष्टीकरण मागविले होते.
Gautam Adani
Gautam Adanisarkarnama
Published on
Updated on

Gautam Adani US Case : अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आणि त्यांचे पुतणे सागर अदानी यांच्याविरोधातील अमेरिकेतील फौजदारी खटला अखेर कायमचा बंद झाला आहे. न्यूयॉर्कच्या जिल्हा न्यायालयाने गौतम अदानी, सागर अदानी आणि ‘अदानी ग्रीन एनर्जी’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विनीत जैन यांच्यावरील आरोप फेटाळून लावले. त्यामुळे हे आरोप पुन्हा दाखल करता येणार नाहीत.

अमेरिकेच्या न्याय विभागाने फौजदारी आरोपपत्र मागे घेण्यासाठी केलेल्या अर्जाला जिल्हा न्या. निकोलस गारॉफिस यांनी मंजुरी दिली. मात्र, खटला मागे घेण्यामागील कारणांबाबत न्यायालयाने न्याय विभागाकडून अतिरिक्त स्पष्टीकरण मागविले होते. सरकारने दिलेली कारणे व आरोपींची शपथपत्रे तपासल्यावर न्यायालयाने खटला बंद करण्यास मंजुरी दिली.

प्रकरण काय?

प्रकरणाची सुरुवात नोव्हेंबर २०२४ मध्ये झाली होती. अमेरिकेच्या सरकारी वकिलांनी गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन आणि अन्य व्यक्तींवर भारतातील सरकारी अधिकाऱ्यांना सुमारे २५ कोटी डॉलरची लाच देण्याचा कट रचल्याचा आरोप केला होता.

Gautam Adani
Shivsena Politics : सुनावणी संपल्यानंतर सुप्रीम कोर्टाबाहेर शिवसेना नेत्यांमध्ये ड्रामा; राऊतांचा आदेश अन् अनिल देसाई नरेश म्हस्केंच्या दिशेने धावले...

सौरऊर्जा प्रकल्पांची कंत्राटे मिळविण्यासाठी ही लाच देण्यात आल्याचा आरोप होता. मात्र, अदानी समूहाने सुरुवातीपासूनच हे आरोप फेटाळले होते. 'कायद्यावरील विश्वास कायम’ म्हणत या निकालाचे गौतम अदानी यांनी स्वागत केले.

Gautam Adani
Nashik Pothole : गिरीश महाजनांनी MGNL कंपनीला खडसावलं अन् महापालिकेवरच गेम उलटला; खड्ड्यांसाठी दिलेले 290 कोटी लाडक्या नगरसेवकांकडे...

'या निर्णयाकडे मी नम्रतेने आणि न्याय प्रक्रियेबद्दलच्या आदराने पाहतो. आमच्यावर, व्यवस्थेवर आणि भारताच्या न्यायक्षमतेवर विश्वास कायम ठेवणाऱ्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो", असे अदानी यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com