Shivsena Politics : सुनावणी संपल्यानंतर सुप्रीम कोर्टाबाहेर शिवसेना नेत्यांमध्ये ड्रामा; राऊतांचा आदेश अन् अनिल देसाई नरेश म्हस्केंच्या दिशेने धावले...

Sanjay Raut and Naresh Mhaske viral video : मंगळवारी सुनावणी संपल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत आणि अनिल देसाई तसेच शिंदेंचे खासदार नरेश म्हस्के हे सुप्रीम कोर्टाबाहेर समोरासमोर आले. माध्यमांशी संवाद साधण्यापूर्वी संजय राऊत आणि नरेश म्हस्के यांच्यात काहीतरी चर्चा सुरू असल्याचं व्हिडिओत दिसत आहे.
Shiv Sena leaders Sanjay Raut, Anil Desai and Naresh Mhaske outside the Supreme Court after the hearing.
Shiv Sena leaders Sanjay Raut, Anil Desai and Naresh Mhaske outside the Supreme Court after the hearing.Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Navi Delhi News, 12 Aug : शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीमुळे महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा तापले आहे. या प्रकरणावर बुधवारी (ता.१२) पुन्हा सुनावणी होणार आहे. दरम्यान, मंगळवारी झालेल्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाबाहेर ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांमध्ये घडलेल्या एका प्रसंगाचा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

मंगळवारी सुनावणी संपल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत आणि अनिल देसाई तसेच शिंदेंचे खासदार नरेश म्हस्के हे सुप्रीम कोर्टाबाहेर समोरासमोर आले. माध्यमांशी संवाद साधण्यापूर्वी संजय राऊत आणि नरेश म्हस्के यांच्यात काहीतरी चर्चा सुरू असल्याचं व्हिडिओत दिसत आहे.

याचवेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल देसाई हे अचानक नरेश म्हस्के यांच्या दिशेने धावत गेल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. या प्रसंगामुळे उपस्थितांचे आणि माध्यम प्रतिनिधींचे लक्ष वेधले गेले. व्हिडिओमध्ये संजय राऊत नरेश म्हस्केंना चर्चेसाठी बोलावत असल्याचं दिसत आहे. मात्र, म्हस्केंनी नकार दिला.

Shiv Sena leaders Sanjay Raut, Anil Desai and Naresh Mhaske outside the Supreme Court after the hearing.
Raj Thackeray Meets Fadnavis : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड! ठाकरे थेट CM फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल

यावेळी राऊतांनी त्यांच्यासोबत असलेल्या अनिल देसाईंना "घेऊन ये त्याला" असं म्हटलं. अनिल देसाई म्हस्केंना आणण्यासाठी त्यांच्या दिशेने धावताच म्हस्के तिथून निघून जातात. त्याचवेळी राऊतांनी, "अरे ये ना, यावच लागणार आहेना", असं म्हटलं. हा सर्व प्रसंग मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रसंगानंतर संजय राऊत, नरेश म्हस्के आणि अनिल देसाई हे हसताना दिसत आहेत.

आज पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी पुन्हा सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.

Shiv Sena leaders Sanjay Raut, Anil Desai and Naresh Mhaske outside the Supreme Court after the hearing.
BJP Corporators : CM फडणवीसांच्या कार्यक्रमाला दांडी मारणं नगरसेवकांच्या अंगलट येणार; भाजप 'त्या' 40 जणांना नोटीस पाठवणार

सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर जोरदार आक्षेप घेतला. आमदारांमध्ये किंवा विधिमंडळ पक्षात फूट पडली म्हणजे संपूर्ण राजकीय पक्षात फूट पडली, असा निष्कर्ष काढता येत नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला. निवडणूक आयोगाने आपल्या अधिकारक्षेत्राचा गैरवापर केल्याचा आरोपही सिब्बल यांनी यावेळी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com