IAS Transfer News: सरकारकडून प्रशासनात मोठे फेरबदल; जिल्हाधिकारीसह विविध मोठ्या पदांवरील तब्बल 17 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Gujarat Government: गुजरातमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होत आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून प्रशासकीय पातळीवर सध्या मोठे फेरबदल सुरू असल्याचं दिसून येत आहे. शुक्रवारी (ता.23) भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS)तब्बल 17 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
Ias transfer
Ias transferSarkarnama
Published on: 
Updated on: 

Gujarat News: गुजरातमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होत आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून प्रशासकीय पातळीवर सध्या मोठे फेरबदल सुरू असल्याचं दिसून येत आहे. शुक्रवारी (ता.23) भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS)तब्बल 17 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या बदल्यांमध्ये मेहसाणा, आणंद आणि वाव-थराड जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्यांचाही समावेश आहे.

गुजरात सरकारच्या सामान्य प्रशासन विभागानं (GAD) जारी केलेल्या अधिसूचनेत आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबतची माहिती देण्यात आली आहे.या बदल्यांच्या आदेशामध्ये आदिवासी विकास विभागाचे सचिव आलोक कुमार पांडे यांच्याकडे मदत आयुक्त आणि महसूल विभागाचे पदसिद्ध सचिव म्हणून अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. त्यामुळे गौरांग एच. मकवाना यांना या अतिरिक्त जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेत ही माहिती देण्यात आली आहे.

मेहसाणा येथील उत्तर गुजरात वीज कंपनी लिमिटेडचे (UGVCL) व्यवस्थापकीय संचालक गौरांग एच. मखवाना यांच्याकडे पुढील आदेश येईपर्यंत गांधीनगर येथील INDEXT-B या संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

आयएएस अधिकारी व शिक्षण विभागात अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत असलेल्या जी. टी. पांड्या यांची बदली करण्यात आली आहे. त्यांना गांधीनगर येथे माहिती संचालकपदाची संधी देण्यात आली आहे.

Ias transfer
Uttar Pradesh Election: लोकसभेच्या 'सेमी फायनल'साठी 'नो रिस्क'; तावडेंचा सर्व्हे अन् भाजपमध्ये अस्वस्थता; अनेक विद्यमान आमदारांचा पत्ता कट?

मेहसाणाचे जिल्हाधिकारी एस. के. प्रजापती यांची गांधीनगर येथील ग्रामीण विकास आयुक्तालयात अतिरिक्त ग्रामीण विकास आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.गृह विभागात कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत असलेले हर्षित पृथ्वीराज गोस्वामी यांची मेहसाणाच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

आणंदचे जिल्हाधिकारी प्रवीण चौधरी यांची गांधीनगर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, विशेष प्रकल्प (धोलेरा विशेष गुंतवणूक क्षेत्र आणि मांडल-बेचराजी विशेष गुंतवणूक क्षेत्र) या पदावर बदली करण्यात आली आहे.चौधरी यांच्या जागेवर कच्छ-भुजचे जिल्हा विकास अधिकारी उत्सव गौतम यांची आणंदच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Ias transfer
500 Crore Audio Clip: जरांगेंच्या 'ऑडिओ क्लिप बॉम्ब'नं महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; खासदार श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया समोर

बनासकांठा-पालनपूरचे जिल्हा विकास अधिकारी एम.जे.दवे यांची नव्याने स्थापन करण्यात आलेल्या वाव-थराड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. तसेच दुसरीकडे अहमदाबाद येथील सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशनचे (SPIPA) उपमहासंचालक सी.सी.कोटक यांची अहमदाबाद येथील राज्य ग्रामीण विकास संस्थेच्या (SIRD) विशेष संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

तापी जिल्ह्याचे जिल्हा विकास अधिकारी राम निवास बुगालिया यांची बनासकांठा-पालनपूर येथे जिल्हा विकास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर वलसाडचे जिल्हा विकास अधिकारी अतिराग चापलोत यांची कच्छ-भुज येथे जिल्हा विकास अधिकारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

गुजरात राज्य गॅस लिमिटेडचे कार्यकारी संचालक बी.एन.पटेल यांची गांधीनगर येथे गुजरात क्रीडा प्राधिकरणाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सरकारच्या नव्या अधिसूचनेत छोटाउदेपूर येथे प्रकल्प प्रशासक म्हणून कार्यरत असलेले ओंकार राजेंद्र शिंदे यांची त्याच जिल्ह्यात जिल्हा विकास अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

छोटा उदेपूरचे जिल्हा विकास अधिकारी सचिन कुमार यांची गृह विभागात कायदा व सुव्यवस्था विभागाचे उपसचिव म्हणून बदली करण्यात आली आहे.त्यांनी हर्षित गोस्वामी यांच्याजागेवर नियुक्ती करण्यात आली आहे. याचदरम्यान,महिसागर येथील आदिवासी क्षेत्र उपयोजना विभागाच्या प्रकल्प प्रशासक वंदना मीना यांची वलसाडच्या जिल्हा विकास अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

तापी जिल्ह्यातील सोनगढ येथे प्रकल्प प्रशासक म्हणून कार्यरत असलेले राजेश कुमार मौर्य यांची अमरेलीच्या जिल्हा विकास अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. त्यामुळे के. जे. जडेजा यांना या पदाच्या अतिरिक्त कार्यभारातून मुक्त करण्यात आले आहे. नवसारी जिल्ह्यातील वांसदा येथे प्रकल्प प्रशासक म्हणून कार्यरत असलेले स्वप्निल महादेव सिसले यांची तापीच्या जिल्हा विकास अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com