Gurmeet Ram Rahim Acquitted : मोठी बातमी! बाबा राम रहीमची हत्येच्या आरोपातून निर्दोष मुक्तता, न्यायालयाने तिघांना ठरवले दोषी

Ram Chander Chhatrapati Murder Gurmeet Ram Rahim : पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्या प्रकरणात हायकोर्टाने राम रहिम यांच्या विरोधात ठोस पुरावे नसल्याचे सांगत त्यांनी निर्दोष मुक्तता केली.
Ram Rahim
Ram Rahim Sarkarnama
Published on
Updated on

Gurmeet Ram Rahim News : पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येच्या आरोपात जन्मठेपीची शिक्षा भोगत असलेले गुरमित राम रहीम यांना पंजाब हरियाणा हायकोर्टाने निर्दोष मुक्त केले आहे. तर, तीन आरोपी कुलदीप सिंह, निर्मल सिंह, कृश्ण लाल यांची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे.

17 जानेवारी 2019 मध्ये डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहीम यांना दोषी ठरवून सीबीआयच्या विशेष न्यायालयाने त्यांना सात वर्षांची शिक्षा सुनावली होती. आरोपींनी या विरोधात हाय कोर्टात धाव घेतली होती.

आज झालेल्या सुनावणीमध्ये हायकोर्टाने राम रहिम यांच्या विरोधात ठोस पुरावे नसल्याचे सांगत त्यांनी निर्दोष मुक्तता केली. दरम्यान, या विरोधात सीबीआयने सुप्रीम कोर्टात दाद मागितली आहे.

दरम्यान, हत्येच्या आरोपातून राम रहिम यांची सुटका झाली असली तरी साध्वींच्या यौन शोषणाच्या आरोपात त्यांना 10 वर्षांची शिक्षा झाली आहे. त्यामुळे त्यांना अजुनही तुरुंगातच राहावे लागणार आहे.

Ram Rahim
UPSC Result News: UPSCमध्ये महाराष्ट्रातील 60 हून अधिक विद्यार्थ्यांनी मारली बाजी; पहिल्या 100 मध्ये 5 विद्यार्थी; 'या' पदांवर होणार रूजू

2002 मध्ये हत्या

पत्रकार रामचंद्र छत्रपती यांनी बाबा राम रहिम आणि त्यांच्या सच्चा डेरा बाबत काही बातम्या आपल्या वर्तमान पत्रातून प्रसिद्ध केल्या होत्या, त्यानंतर 2022 मध्ये गोळीमारून त्यांनी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सीबीआय करत होती. या प्रकरणाचे धागेदोरे बाबा राम रहीम प्रमुख आरोपी असल्याचे सांगत सीबीआयकडून त्यांना अटक करण्यात आली होती. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने त्यांना शिक्षा देखील सुनावली होती.

Ram Rahim
Loan Waive : शेतकरी कर्जमाफी फसवी, 'सरसकट' शब्दावरून पवारांचा सरकारवर निशाणा, म्हणाले,...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com