

MLA Confession: बिहारमध्ये विधानपरिषद निवडणुकीपूर्वी जनता दल युनायटेडमध्ये पक्षांतर्गत सुरु असलेला वाद आता अधिक व्यापक होत चालला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर बाहुबली आमदार अनंत सिंह यांनी ऑन कॅमेरा मोठा दावा केला आहे. नितीश कुमार यांचं नाव घेत या आमदारानं हे माध्यमांच्या कॅमेरॅसमोर हे कबूल केलंय की, त्यानं ९ जणांच्या हत्या केल्या आहेत.
बिहारच्या मोकामाचे आमदार अनंत सिंह यांनी हा खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी म्हटलं की, आम्ही पक्षाला मानतो, हा आमचा पक्ष आहे. पक्षानं मानलं किंवा न मानलं तरी आम्ही पक्षासाठी खूप बलिदान दिलं आहे. जेव्हा नितीश कुमार कोणीही नव्हते ते जेव्हा इकडे-तिकडे असायचे तेव्हा आम्ही नितीश कुमार यांच्यासोबत राहून आम्ही आमच्याच ९ लोकांच्या हत्या केल्या आहेत.
अनंत सिंह सध्या जेडीयूमध्ये नाराज आहेत. कारण पक्षानं आगामी विधानपरिषद निवडणुकीत त्यांचे राजकीय वैरी असलेले नीरज कुमार यांना उमेदवार निवडलं आहे. अनंत सिंह यांनी याचा विरोध केला आहे. पण पक्षाच्या हायकमांडनं निर्णय बदलला नाही. वादाचा मुद्दा आणखी एक आहे की, अनंत सिंह हे आपल्या पक्षाच्या उमेदवाराचं समर्थन करण्याऐवजी जनसुराज पक्षाच्या उमेदवार डॉ. अनुज सिंह यांच्या समर्थनार्थ प्रचारात उतरले आहेत. त्यांच्या या भूमिकेवरुन आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
नीरज कुमार यांना उमेदवारी देण्यावरुन आमदार अनंत सिंह यांनी म्हटलं की, पक्षानं अशा व्यक्तीला उमेदवार म्हणून निवडलं की, या उमेदवारासोबतच त्यांचे मतभेद आहेत. टीका केल्यानंतरही अनंत सिंह यांनी म्हटलं की, नीरज कुमार यांच्या उमेदवारीशी संबंधित वाद सोडून इतर प्रकरणांमध्ये पक्षाच्या निर्देशांचं पालन करण्यास मी तयार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.