punjab election
punjab electionsarkarnama

पंजाबमध्ये आपची मोठी आघाडी तर काँग्रेस दुसऱ्या स्थानी

दिल्लीनंतर आपला (AAP) पंजाबमध्ये (Punjab) सत्ता मिळणार असल्याची चिन्हं दिसत आहेत.
Published on

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीस सुरूवात झाली असून पंजाबमध्ये एक्झिट पोल (Exit Poll) नुसारच कल दिसत असून आपने (AAP) पंजाबमध्ये जोरदार आघाडी घेतली आहे. पंजाबमधील 117 जागांमधील 57 जांगापैकी 32 जांगावर आपने आघाडी घेतली असून सत्तेत असलेल्या काँग्रेसला (Congress) 18 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर शिरोमणी आकाली दलाला 5 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर भाजपने 2 जागेवर आघाडी घेतल्याचे सुरूवातीचे चित्र आहे.

punjab election
गोव्यातील मोहिमे फत्ते केल्यानंतर फडणवीसांच्या जंगी स्वागताची तयारी; असा आहे प्लॅन...

पंजाबमधील (Punjab Election 2022) २२ जिल्ह्यातील सर्व ११७ जागांवर 20 फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. पंजाबमध्ये एकाच टप्यात मतदान झाले असून आज (ता.10 मार्च) निवडणुकीचा निकाल लागणार आहे. राज्यात कॉग्रेसला आपची टक्कर आहे. निवडणुकीत भाजप हा शिरोमणी अकाली दलापासून वेगळा झाला आहे. तर कॅप्टन अमरिंदर सिंह (Amarinder Singh) नवे राजकीय भागीदार म्हणून भाजपसोबत आहेत. पण त्याचा काही परिणाम निवडणुकीत झालेला दिसत नसल्याचे सुरूवातीच्या निकालावरून दिसत आहे.

punjab election
Goa Election:निकालापूर्वीच कॉग्रेसने सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांची वेळ मागितली..

7 मार्चला 'एनडीटीव्ही'ने विविध एक्झिट पोलच्या केलेल्या सरासरीमध्ये काँग्रेसची पंजाबमधील सत्ता जाताना दिसत असल्याचे म्हटले होते. राज्यात काँग्रेसला जवळपास 50 जागांचे नुकसान होत असून केवळ 27 जागा मिळण्याची शक्यता एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आली होती. तर आप 70 जागांच्या जवळपास पोहचत राज्यात सत्ता मिळवेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मागील निवडणुकीत आपला केवळ 20 जागा मिळाल्या होत्या. मात्र, दिल्लीनंतर आपला पंजाबमध्ये सत्ता मिळणार असल्याची चिन्हं दिसत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com