India Alliance: दिल्लीतून मोठी राजकीय अपडेट; 'इंडिया' आघाडीचा ज्ञानेश कुमारांसह तीन मोठ्या मुद्द्यांविरोधातला 'मास्टर प्लॅन' 30 सप्टेंबरला ठरणार

Election Commission News: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत इंडिया आघाडीतील पक्षांच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक नवी दिल्ली येथे 30 सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. या इंडिया आघाडीच्या बैठकीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या मुद्द्यावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
India Alliance meeting
India Alliance meetingSarkarnama
Published on: 
Updated on: 

New Delhi News: लोकसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आरोपांची आणखी धार टोकदार केली आहे. त्यांच्या गंभीर आरोपांनंतर विरोधकांच्या इंडिया आघाडीनंही मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मोठा डाव टाकण्याच्या तयारीत आहे.याच पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत 30 सप्टेंबरला इंडिया आघाडीतील पक्षांच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत इंडिया आघाडीतील पक्षांच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक नवी दिल्ली येथे 30 सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. या इंडिया आघाडीच्या बैठकीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या मुद्द्यावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

आता काँग्रेस आणि विरोधकांच्या 'इंडिया'आघाडीतील घटक पक्षांनी मुख्य केद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात महाभियोग आणण्याच्या प्रस्तावावर एकमत झाल्याची माहिती समोर येत आहे. पुढील दोन आठवड्यांत हा महाभियोगाचा प्रस्ताव दोन्ही सभागृहात सादर होण्याची दाट शक्यता आहे. त्याच धर्तीवर विरोधकांच्या दिल्लीतील या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात महाभियोग कसा आणायचा,तसंच दिल्लीतील आंदोलनासंदर्भात या इंडिया आघाडीच्या बैठकीत प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे. विरोधी पक्षांनी एकत्र येत मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहांत महाभियोग आणण्याची तयारी सुरू केली आहे.

India Alliance meeting
Ganesh Visarjan: 33 तास 33 मिनिटे या 'विक्रमी' वेळेनंतर पुणे गणेश विसर्जन मिरवणूक संपली; मंडळांवर कारवाई होणार? पोलिस आयुक्तांचं मोठं विधान

इंडिया आघाडीच्या ज्ञानेश कुमार, निवडणूक आयोग,एसआयआर विरोधातील रणनीती आखण्यासाठीच्या या बैठकीला अखिलेश यादव, उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे,मेहबुबा मुफ्ती, अरविंद केजरीवाल,ममता बॅनर्जी,तेजस्वी यादव यांसह विविध नेतेमंडळी सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

या इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी 29 सप्टेंबरला काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे. ही बैठक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांसह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या बैठकीत एसआयआरच्या मुद्द्यावर काँग्रेस पक्ष रणनीती आखणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

India Alliance meeting
NCP Chhagan Bhujbal: ...अखेर मंत्री भुजबळांपाठीमागचं 'कायदेशीर' दुष्टचक्र संपलं! धडाकेबाज राजकीय कारकीर्दीवर तीन प्रकरणांनी उडवलेले डाग

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com