Ganesh Visarjan: 33 तास 33 मिनिटे या 'विक्रमी' वेळेनंतर पुणे गणेश विसर्जन मिरवणूक संपली; मंडळांवर कारवाई होणार? पोलिस आयुक्तांचं मोठं विधान

Pune News: पुणे पोलिसांनीही विसर्जन मिरवणुका सुरक्षितपणे आणि वेळेत पूर्ण होण्याच्या उद्देशानं गणेश मंडळांसाठी आदेश काढले होते. मात्र, ते सर्व आदेश,नियम गणेश मंडळांनी धाब्यावर बसवून मनमानी कारभार सुरू ठेवल्याचंच चित्र यंदा पाहायला मिळालं.
Pune Police And Ganesh Visarjan .jpg
Pune Police And Ganesh Visarjan .jpgSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News: पुण्यातील गणेश विसर्जन सोहळा तब्बल 30 उलटूनही सुरुच आहे.शहरातील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकांनंतरही लक्ष्मी रोड, कुमठेकर रस्ता, टिळक रोड यांसह विविध मार्गांवरुन प्रमुख गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका संथ गतीनं पुढे सरकत असल्याचं चित्र पाहायला मिळालं.अखेर पुणे शहर विसर्जन मिरवणूक सायंकाळी 6.15 वा संपली. गणपती ‘महाराष्ट्र तरुण मंडळ’ लकडीपुलाकडे रवाना होणारा अखेरचा गणपती ठरला. पुण्याची गणेश विसर्जन मिरवणूक 33 तास 33 मिनिटे या विक्रमी वेळेनंतर संपली आहे.

पुणे शहरातील मिरवणुकांसाठी नेहमीच खास आकर्षण असणारा अलका टॉकीज चौक शनिवारी सकाळपासून ते सायंकाळपर्यंत प्रचंड गर्दीनं गजबजलेला दिसून आला.यावेळी मुंबई उच्च न्यायालयानं गणेश विसर्जन मिरवणुकीतील डीजे ,लाऊड स्पिकरच्या वापरावर कठोर घालून दिले होते. तसेच पुणे पोलिसांनीही विसर्जन मिरवणुका सुरक्षितपणे आणि वेळेत पूर्ण होण्याच्या उद्देशानं गणेश मंडळांसाठी आदेश काढले होते. मात्र, ते सर्व आदेश,नियम गणेश मंडळांनी धाब्यावर बसवून मनमानी कारभार सुरू ठेवल्याचंच चित्र यंदा पाहायला मिळालं.

यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीतील धक्कादायक बाब म्हणजे या मिरवणुकांमध्ये डीजेचा दणदणाट, शिवराळ गाणी, किळसवाणे अश्लील हावभाव करत तरुणाई थिरकताना दिसून आली. पोलिस अधिकारीही कानात हेडफोन घालून या मिरवणुकांकडे बघ्याची भूमिका घेत पाहतच राहिल्याचं चित्रही काहीवेळ पाहायला मिळालं.

शनिवारी सायंकाळी पाच वाजेनंतरही अलटा टॉकीज चौकात अनेक मंडळांचा डीजे आणि साऊंड सिस्टीमचा दणदणाट अजूनही सुरू होता. मोठ्या संख्येनं गणेश मंडळांच्या डीजेच्या गाण्यांच्या तालावर तरुणाई नाचताना दिसत होती.

Pune Police And Ganesh Visarjan .jpg
NCP Chhagan Bhujbal: ...अखेर मंत्री भुजबळांपाठीमागचं 'कायदेशीर' दुष्टचक्र संपलं! धडाकेबाज राजकीय कारकीर्दीवर तीन प्रकरणांनी उडवलेले डाग

पुणे गणेश विसर्जन मिरवणूक पार पडल्यानंतर अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पुणेकर नागरिक, गणेश मंडळे आणि गणेशभक्तांनी हा मिरवणूक सोहळा यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल सहकार्य लाभले म्हणून त्यांचे आभार मानले. यापुढील काळातही शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुणेकरांचे आम्हांला सहकार्य मिळेल अशी अपेक्षाही व्यक्त केली.तसेच अतिशय चांगल्या पद्धतीनं गणेश विसर्जन मिरवणुका पार पडल्याचंही त्यांनी सांगितलं.

तसेच पूर्णपणे डीजे, लाऊडस्पीकरचा मिरवणुकीतील घालून दिलेल्या नियमांनुसार 100 गणेश मंडळांकडून वापर झाला नाही, असं म्हणणं आपलं नसल्याचंही पुणे पोलिस आयुक्त म्हणाले. त्यांनी यावेळी नियमांचं उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांवर कठोर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

Pune Police And Ganesh Visarjan .jpg
DK Shivakumar : डझनभर आमदारांची दोन लग्ने? खुद्द मुख्यमंत्र्यांनीच उडवून दिली राजकीय वर्तुळात खळबळ; नावे जाहीर करण्याची कर्नाटक भाजपची मागणी

तसेच फोनवर आपला आणि समोरचा आवाज क्लिअर येण्यासाठी बोलणं सोपं जावं यासाठी कानात फेडफोन घालून बसल्याचं स्पष्टीकरण आयुक्त अमितेश कुमार यांनी यावेळी माध्यमांसमोर दिलं. त्यांनी यावेळी विसर्जन मिरवणुका किती वेळ चालल्या याला प्राधान्य नसून चांगल्या पार पडल्या हे महत्त्वाचं असल्याचंही म्हटलं.

पुणे शहरातील दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 248 गणेश मंडळांचं अलका टॉकीज चौकातून पुढे जाऊन विसर्जन पार पडलं होतं. परंतू,त्यानंतरही लहान-मोठी गणेश मंडळे शहरातील लक्ष्मी रस्ता,कुमठेकर रस्ता,टिळक रस्ता आणि केळकर रस्ता या चार प्रमुख रस्त्यांवरून अलका चौकाकडे विसर्जनासाठी येत होती. पुणे शहर विसर्जन मिरवणूक सायंकाळी ६:१५ वा समाप्त झाली आहे. त्यात शेवटचा गणपती ‘महाराष्ट्र तरुण मंडळ’ लकडीपुलाकडे विसर्जनासाठी रवाना झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com