Maharashtra drought news : अजिबात काळजी करू नका..! पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिला शब्द...

Drought-hit farmers, farmers relief Maharashtra : PM मोदींनी शेतकऱ्यांना मदतीसाठी देशवासियांनाही आवाहन केले. ते म्हणाले, देशवासियांनो, शेतकऱ्यांचीही आठवण आपल्याला ठेवायची आहे.
Prime Minister Narendra Modi assures drought-affected farmers in Maharashtra of government support while inaugurating the Hinjewadi-Shivajinagar Metro route in Pune.
Prime Minister Narendra Modi assures drought-affected farmers in Maharashtra of government support while inaugurating the Hinjewadi-Shivajinagar Metro route in Pune.Sarkarnama
Published on: 
Updated on: 

PM Narendra Modi news : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी पुण्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गाचे लोकापर्ण झाले. त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखविल्यानंतर ही सेवा पुणेकरांच्या सेवेत दाखल झाली. यावेळी संवाद साधताना पंतप्रधान मोदींनी पुण्याच्या विकासासाठी सरकार कटिबध्द असल्याचे सांगतानाच महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनाही दिलासा दिला.

'विकसित भारत'वर भाष्य करतानाच पंतप्रधानांनी यामध्ये शेतकऱ्यांची भूमिकाही महत्वाची असल्याचे सांगितले. ते म्हणाले, विकसित भारतच्या या प्रवासात शेतकऱ्यांचीही मोठी भूमिका आहे. त्यासाठी आमचे सरकार शेतकऱ्यांना सातत्याने सशक्त करत आहे.

महाराष्ट्रात दुष्काळामुळे अनेक शेतकरी कुटुंबांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मागील काही वर्षांत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात जलसंरक्षणाचे मोठे काम झाले आहे. पण या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. मी महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी बंधू-भगिनींना विश्वास देतो की, या संकटकाळात एनडीए सरकार शेतकऱ्यांसोबत संवेदनशीलतेने उभी आहे, असा विश्वास पंतप्रधानांनी दिली.

Prime Minister Narendra Modi assures drought-affected farmers in Maharashtra of government support while inaugurating the Hinjewadi-Shivajinagar Metro route in Pune.
Amit Shah news : अमित शहांचा 2029 साठी 'त्या' पर्यायावर 82 दिवसांनंतरही विचार सुरू! विरोधकांना धडकी...

महाराष्ट्रातील दुष्काळाची मला माहिती आहे. राज्य सरकारने दुष्काळाची आगाऊ मदतसुध्दा दिली आहे. मी पीएम किसानचा निधी जमा केला आहे. अजिबात काळजी करू नका, आम्ही सारे शेतकऱ्यांसोबत आहोत, असा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिला. पंतप्रधानांनी यावेळी मराठीतून संवाद साधला.

Prime Minister Narendra Modi assures drought-affected farmers in Maharashtra of government support while inaugurating the Hinjewadi-Shivajinagar Metro route in Pune.
नेतेगिरी भोवली, आंदोलन करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची उचलबांगडी

PM मोदींनी शेतकऱ्यांना मदतीसाठी देशवासियांनाही आवाहन केले. ते म्हणाले, देशवासियांनो, शेतकऱ्यांचीही आठवण आपल्याला ठेवायची आहे. त्यांच्या घरीही दिवाळी चांगल्याप्रकारे साजरी होईल, याकडे लक्ष असायला हवे. ही सामाजिक जबाबदारीही आहे. शेतकऱ्यांसह गावातील इतरांना भेडसावणाऱ्या अडचणींकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. सर्वांनी मिळून या संकटाचा सामना करू. सर्वांचा एकजुटीने प्रयत्न हाच विकसित भारताचा संकल्प आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.