Plane crash News : देश पुन्हा हादरला! चार्टर्ड विमानाचा भीषण अपघात, सात जणांचा मृत्यू; नावं आली समोर...

Air ambulance crash India : विमानाने भारतीय प्रमाणवेळेनुसार, सायंकाळी ७ वाजून ११ मिनिटांनी उड्डाण केले होते. कोलकाता एटीसीसोबत त्यांचा संपर्क झाल्यानंतर काही मिनिटांतच म्हणजे ७ वाजून ३४ मिनिटांनी विमानाचा रडारशी संपर्क तुटला.
Air ambulance crash India
Air ambulance crash IndiaSarkarnama
Published on
Updated on

Air ambulance tragedy : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर संपूर्ण देशाला हादरा बसला होता. या चार्टर्ड विमानाच्या अपघातानंतर अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. केंद्रीय यंत्रणांकडून अपघाताची सखोल चौकशी सुरू असतानाच आणखी एका चार्टर्ड विमानाच्या अपघाताने खळबळ उडाली आहे. सोमवारी रात्री झालेल्या या अपघातात विमानातील सर्व सात जणांचा मृत्यू झाला आहे.

झारखंडमधील रांची विमानतळावरून या विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळात ते रडारवरून गायब झाले. त्यानंतर छतरा जिल्ह्यातील करमाटांड गावाजवळ दाट जंगलात हे विमान कोसळल्याचे सांगितले जात आहे. या विमानाचा वापर एअर एम्ब्युलन्स म्हणून केला जात होता. रांचीहून एका रुग्णाला घेऊन हे विमान दिल्लीकडे निघाले होते. अपघातामध्ये याच रुग्णासह त्याची पत्नी व इतर पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

कोण-कोण होते विमानात?

विमानामध्ये ४१ वर्षीय रुग्ण संजय कुमार, त्यांचे नातेवाई अर्चना देवी आणि धुरू कुमार, उपचार करणारे डॉ. विकास कुमार गुप्ता, सहकारी सचिन कुमार मिश्रा यांच्यासह मुख्य पायलट विवेक विकास भगत आणि को-पायलट स्वराजदीप सिंह हे सात जण होते. अपघातामध्ये या सर्वांचा मृत्यू झाला आहे. सर्वांची ओळख पटल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Air ambulance crash India
Rahul Gandhi : काहीही झाले तरी राहुल गांधीच ‘बॉस’; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतरही परिणाम नाही?

कसा झाला अपघात?

अपघाताबाबत डीजीसीएने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, रेडबर्ड एअरवेज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे बीचक्राफ्ट सी ९० या विमानाने रांचीहून दिल्लीसाठी उड्डाण केले होते. झारखंडमधील छतरा जिल्ह्यातील कसारिया परिसरात दुर्घटनाग्रस्त झाले आहे. विमानामध्ये दोन पायलटसह एकूण सात जण होते.

विमानाने भारतीय प्रमाणवेळेनुसार, सायंकाळी ७ वाजून ११ मिनिटांनी उड्डाण केले होते. कोलकाता एटीसीसोबत त्यांचा संपर्क झाल्यानंतर काही मिनिटांतच म्हणजे ७ वाजून ३४ मिनिटांनी विमानाचा रडारशी संपर्क तुटला. त्यावेळी या भागात पाऊस पडत होता. खराब हवामानामुळे विमान भरकटल्याचे सांगितले जात आहे.

Air ambulance crash India
Mamata Banerjee : ममतादीदींचा भाजपला ‘जोर का झटका’; भलेभले गेले चक्रावून, मोदी-शहांच्या चाणक्यनीतीला तोडीस तोड राजकीय डाव

छतराचे पोलीस अधिक्षक सुमित अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील लोकांनी अपघाताबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांची टीम घटनास्थळी तातडीने रवाना झाली. घनदाट जंगलात विमान अपघातग्रस्त झाले आहे. त्यामुळे बचावकार्यात अडथळे येत असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com