Gulabrao Patil: शिंदेसेना ही 'लोफरांची'? राऊतांच्या आरोपावर गुलाबराव भडकले; म्हणाले, 'कावळ्याचं बसणं अन् फांदीचं तुटणं...'

Maharashtra Politics Gulabrao Patil Responds to MP Sanjay Raut's Allegations: भाजपला बाळासाहेब आणि पवारांनी मदत केली असल्यावरही शिवसेना, राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी उपकाराची भाषा करण्याऐवजी दोघांचे पक्ष फोडले आहे, असा दावा राऊत यांनी केला आहे.
Shivsena News
Shivsena News Sarkarnama
Published on
Updated on

देविदास वाणी

Jalgaon News: शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी लिहिलेल्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकात त्यांनी अनेक दावे केले आहेत. त्यावरुन आता राजकीय चिखलफेक सुरु झाली आहे.

खासदार राऊतांनी शिंदेंची शिवसेना ‘लोफरांची’ आहे, असा आरोप केला आहे? त्यावर जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, "संजय राऊत महालोफर आहे. कावळ्याचे बसणं आणि फांदीचं तुटणं अशातचा हा प्रकार आहे. ते ठाकरे गटात एकटेच असल्याने तेच बोलत असतात.,"

राऊतांनी लिहिलेल्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकात गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शाह या दोघांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मदत केली, असल्याचे म्हटलं आहे. आता यावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मोदी आणि शाह यांना बाळासाहेबांनी केलेल्या मदतीचा किस्सा राऊतांनी पुस्तकात सांगितला आहे.

Shivsena News
Gokul Dudh Sangh: मुन्नाचं ज्ञान कमी, बंटीनं काढला वचपा; 'गोकुळ'च्या अध्यक्षपदावर आज मार्ग निघणार?

नरेंद मोदी गुजरात दंगलीतील संशयित असताना त्यांना बाळासाहेब ठाकरे यांनी त्यातून बाहेर काढले होते. अमित शाह संशयित आरोपी असताना राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना बाहेर काढले होते. भाजपला बाळासाहेब आणि पवारांनी मदत केली असल्यावरही शिवसेना, राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी उपकाराची भाषा करण्याऐवजी दोघांचे पक्ष फोडले आहे, असा दावा राऊत यांनी केला आहे.

याबाबत पालकमंत्री पाटील यांना विचारले असता, ते म्हणाले की बाळासाहेब आणि नरेंद्र मोदी यांचे चांगले मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यांच्याविषयी बोलणे योग्य नाही. राऊत त्यावेळी संपादक होते, मध्यस्थी नव्हते. त्यांना भाजप-शिवसेनेमध्ये काय चालले आहे, याची कल्पना नव्हती. बाळासाहेबांची शिवसेना संपलेली नाही, आम्ही कार्यकर्ते आजही जिवंत आहोत, पवारांविषयी मला माहीत नाही,असे गुलाबराव पाटील म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com