BJP controversy : ...तर भारत पाकिस्तानच्या बाजूने उभा राहील! भाजपच्या बड्या नेत्याचे धक्कादायक विधान, व्हिडिओ व्हायरल, विरोधक तुटून पडले

Pakistan remark, Rajasthan BJP president, Madan Rathore viral video : व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राठोड यांनी यू-टर्न घेतला आहे. मीडियाशी बोलताना आपल्या विधानाची मोडतोड केल्याचा दावा त्यांनी केला आहे.
India Pakistan tensions
India Pakistan tensions Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Pakistan remark controversy : भाजपच्या बड्या नेत्याच्या विधानाने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राजस्थान भाजपचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार मदन राठोड यांनी पाकिस्तानबाबत धक्कादायक विधान केले आहे. अमेरिका आणि पाकिस्तानचे युध्द झाले तर भारत पाकिस्तानच्या बाजूने उभा राहील, असे राठोड म्हणाले आहेत.

मदन राठोड यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. एका कार्यक्रमात बोलताना राठोड यांनी आपल्या विधानाचे समर्थनही केले आहे. त्यांनी भौगोलिक रचनेचा आधार घेत पाकिस्तान आपला शेजारील देश असल्याने भारत बाजू घेईल, असे राठोड म्हणाले आहेत. त्यावरून आता विरोधकांनी जोरदार टीका सुरू केली आहे.

काँग्रेस, आम आदमी पक्षासह अन्य विरोधी पक्षांनी राठोड यांच्या विधानावरून थेट केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावर बोट ठेवले आहे. काँग्रेसने सोशल मीडियात राठोड यांचा व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, भाजपचे पाकिस्तान प्रेम पुन्हा एकदा समोर आले आहे. भाजप त्या पाकिस्तानला साथ देईल, ज्या देशाने भारताच्या नागरिकांची हत्या केली. भाजपच्या लोकांच्या नसानसात देशद्रोह असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.

India Pakistan tensions
Modi government plan : दिवाळीआधीच दिल्लीत होणार मोठा धमाका? मोदी सरकारचा विरोधकांना संसदेत नामोहरम करण्याचा प्लॅन समोर

आपने म्हटले आहे की, जनतेने प्रश्न उपस्थित केले तर पाकिस्तानी, युवकांनी आवाज उठविला तर ते आंतकवादी, पण भाजप नेता जेव्हा पाकिस्तानसोबत उभे राहण्याबाबत बोलतो तेव्हा मोदींचा राष्ट्रवाद कुठे जातो?, असा सवाल आपने केला आहे. पाकिस्तानसोबत उभे राहण्याबाबत बोलणारी भाजप देशद्रोही आहे की नाही?, असा प्रश्नही आपने पंतप्रधान नरेंद्र मोदींना केला आहे.

India Pakistan tensions
Vinod Tawde news : भाजपला केवळ 3 जागा, पक्षाने जनतेचा कौल स्वीकारला! प्रभारी असताना झालेल्या पराभवाकडे बोट दाखवत विनोद तावडेंचा काँग्रेसवर घाव

दरम्यान, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राठोड यांनी यू-टर्न घेतला आहे. मीडियाशी बोलताना आपल्या विधानाची मोडतोड केल्याचा दावा त्यांनी केला आहे. मी भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेट सामन्याविषयी बोलत होतो. पण विधानाचती मोडतोड करण्यात आली. हे योग्य नाही, असे राठोड म्हणाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com