

IAF action after Tejas malfunction: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर, देशातील विमान अपघात हा संवेदनशील विषय बनला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकाॅप्टर देखील उड्डाण वेळी, हेलकावे खात असल्याने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला.
अशातच भारतीय हवाई दलाचे स्वदेशी बनावटीचे हलके लढाऊ विमान 'तेजस'ला पुन्हा झालेला अपघात चर्चेत आला आहे. एका महत्त्वाच्या एअरबेसवर लँडिंग करताना ही दुर्घटना झाली. यानंतर भारतीय हवाई दलाने खबरदारी म्हणून तेजस विमानांच्या ताफ्यातील सुमारे 30 विमानांचे उड्डाण तात्पुरते थांबवली आहेत.
एका प्रशिक्षण मोहिमेवरून परतत असताना तेजस विमानाला लँडिंगच्या वेळी समस्या आली. ही घटना सात फेब्रुवारीच्या सुमारास घडल्याचे सांगितले जात आहे. प्राथमिक तपासानुसार, तेजस विमानाची 'ब्रेक यंत्रणा' निकामी झाली. त्यामुळे विमान धावपट्टीवरून घसरले (Plane Crash) आणि बाजूच्या खड्ड्यात जाऊन कोसळले.
या अपघातात (Accident) तेजस विमानाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे ते पुन्हा सेवेत येण्याची जवळ-जवळ शक्यता नाकारण्यात आली आहे. अपघाताची तीव्रता लक्षात घेता, वैमानिकाने वेळीच प्रसंगावधान राखले आणि 'इजेक्शन' प्रक्रियेद्वारे स्वतःचा जीव वाचवला. वैमानिकाला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही.
या घटनेनंतर भारतीय हवाई दलाने तेजस विमान अपघाताची उच्चस्तरीय चौकशीचा आदेश दिला आहे. जोपर्यंत तांत्रिक तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत तेजस विमानांचे उड्डाण थांबवली आहेत. गेल्या दोन वर्षांतील हा तिसरा मोठा अपघात आहे. या मुळे स्वदेशी विमान कार्यक्रमावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहेत.
तेजस विमानाच्या दुबई एअर-शो मधील अपघाताने जगाचे लक्ष वेधलं होतं. यामध्ये वैमानिकाचा मृत्यू झाला होता. हा अपघात गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झाला होता. यापूर्वी मार्च 2024 मध्ये जैसलमेरजवळ तेजस विमानाचा अपघात झाला होता. या अपघातांच्या मालिकेमुळे स्वदेशी तेजस विमाने तपासली जाणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.