Captain Smit Machchhar : कॅप्टन स्मितसाठी भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांची मोठी मागणी; थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच पत्र धाडणार

Bharat Ratna Demand for Pilot Smit Machchhar : अबू धाबीहून उड्डाण केलेल्या फ्लायदुबईच्या विमानात सह-वैमानिकाने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यातून स्वत: गंभीर जखमी असतानाही १७४ प्रवासी आणि क्रू सदस्यांसह १८० लोकांना वाचवण्याचे काम भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांनी केले.
Bharat Ratna demand for Pilot Smit Machchhar
Bharat Ratna demand for Pilot Smit Machchharsarkarnama
Published on: 
Updated on: 

Karnataka Political News : जगाला हादरवून सोडेल अशी घटना ३० सप्टेंबर २०२६ रोजी घडली होती. फ्लायदुबईचे विमान वेगाने खाली येत होते. यामुळे १७४ प्रवासी आणि क्रू सदस्यांसह १८० लोकांचे जीव धोक्यात आले होते. पण भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांनी अत्यंत गंभीर अवस्थेत असतानाही धैर्य दाखवत सर्वांचे प्राण वाचवले. यानंतर आता त्यांचे जगभर कौतुक होत आहे. इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी मच्छार यांना इस्रायलच्या आगामी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात मशाल प्रज्वलित करण्यासाठी आमंत्रित केले आहे. आता त्यांना भारतरत्न देण्याची मागणी पुढे आली आहे. तर ही मागणी भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. तर याबाबत ते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पत्र पाठवणार आहेत.

फ्लायदुबईच्या विमानात ३० सप्टेंबर २०२६ रोजी मोठी घटना घडली होती. ज्यात कॉकपिटमध्ये को-पायलटने आपल्या मुख्य कॅप्टनवरच अचानक हल्ला केला. ज्यात भारतीय कॅप्टन स्मित मच्छार गंभीर जखमी झाले. विमानात (FZ1073) २७ मुलांसह १७४ प्रवासी आणि क्रू सदस्यांसह १८० लोक प्रवास करत होते. हे विमान दुबईहून इस्रायलच्या तेल अवीवकडे निघाले होते. यावेळी कॅप्टन स्मित मच्छार यांनी धैर्याने हे विमान सौदी अरेबियातील तबूक येथे सुरक्षित उतरवले.

त्यांच्या या धाडसाचे आता जगभर कौतुक होत असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मच्छार याचे कौतुक केले होते. दरम्यान आता मच्छार यांच्याबाबत विविध मागण्या समोर येत आहेत. नुकताच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरा यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून मच्छार यांना राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देण्याची मागणी केली आहे.

Bharat Ratna demand for Pilot Smit Machchhar
Captain Smit Machchhar Ashoka Chakra : कॅप्टन स्मित मच्छार यांना अशोक चक्र का द्यावे? 174 प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या वैमानिकासाठी मोठी मागणी

देवरा यांनी फ्लायदुबई विमानातील 174 प्रवाशांचे प्राण वाचविणारे भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार यांना देशाचा सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पुरस्कार अशोक चक्र प्रदान करावा, अशी मागणी केली आहे. तर कॅप्टन मच्छार यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून संभाव्य दहशतवादी हल्ला टाळत प्रवाशांचे प्राण वाचवल्याचेही म्हटले आहे.

दरम्यान, फ्लाईदुबई विमान दुर्घटनेच्या वेळी दाखवलेल्या अद्भूत शौर्याबद्दल भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार यांना भारतरत्न देण्याची मागणी देशभरातून केली जात आहे. अशीच मागणी भाजप नेते तथा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी केली आहे.

Bharat Ratna demand for Pilot Smit Machchhar
BS Yediyurappa : ते टॉम, डिक किंवा हॅरी नाहीत! येडियुरप्पांच्या अटकेबाबत हायकोर्ट काय म्हणाले?

त्यांनी याबाबत मागणीचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवणार आहे. तर भारतीय कॅप्टन मच्छार यांना देशातील सर्वोच्च पुरस्काराने गौरविण्यात यावे शिफारस करणार आहे. देशातील वाढती मागणीसह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसह भाजप नेत्याने देखील भारतीय कॅप्टन मच्छार यांना सन्मानीत करण्यात यावे अशी मागणी केली आहे. पण अद्याप यावर केंद्राकडून कोणतेच भाष्य समोर आलेले नाही. यामुळे त्यांना मागणीनुसार गौरविण्यात येणार का याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com