Iran Israel War : 'शक्तीशाली देश उभे राहू...', इराणच्या प्रतिनिधींनी युद्धावर पहिल्यांदाच केलं भाष्य; भारताचा उल्लेख करत अमेरिकेबाबत केला खळबळजनक दावा

US Israel Iran conflict : "हे युद्ध अमेरिकेने सुरू केलं आहे. तेच आमच्याआमच्या नागरिकांवर बॉम्ब टाकत आहेत. आम्ही फक्त स्वतःचा बचाव करत असून आम्ही हे युद्ध सुरू केलेले नाही. आता या क्षणी हे युद्ध थांबावे अशी आम्ही आशा करतो. पण हे आमच्या हातात नाही. हे अमेरिका आणि झायोनिस्ट राजवटीच्या हातात आहे.
Aftermath of airstrikes in Minab, Iran, highlighting the devastating impact of the Iran Israel war and rising Gulf tensions.
Narendra Modi, Donald Trump, Abdul Majeed Hakim Elahi
Published on
Updated on

Iran Israel War : अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्धामुळे आखाती देशांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. दोन्ही बाजूंनी सुरू असलेल्या हवाई हल्ल्यात आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. तर या देशांमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

अशातच आता या युद्धा संदर्भात इराणच्या सर्वोच्च नेत्याचे विशेष प्रतिनिधी असलेल्या अब्दुल मजीद हकीम इलाही यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. भारत, चीन आणि रशिया या देशांनी प्रगती करून शक्तीशाली बनू नये यासाठी अमेरिकेने हे युद्ध भडकावल्याचा दावा अब्दुल मजीद हकीम इलाही यांनी केला आहे. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

"हे युद्ध अमेरिकेने सुरू केलं आहे. तेच आमच्याआमच्या नागरिकांवर बॉम्ब टाकत आहेत. आम्ही फक्त स्वतःचा बचाव करत असून आम्ही हे युद्ध सुरू केलेले नाही. आता या क्षणी हे युद्ध थांबावे अशी आम्ही आशा करतो. पण हे आमच्या हातात नाही. हे अमेरिका आणि झायोनिस्ट राजवटीच्या हातात आहे. त्यांनी सुरुवात केली आहे आता त्यांनीच ते थांबवायला हवं", असं इलाही यांनी म्हटलं आहे.

Aftermath of airstrikes in Minab, Iran, highlighting the devastating impact of the Iran Israel war and rising Gulf tensions.
Minab School Attack : डोनाल्ड ट्रम्प यांना घरातूनच मोठा धक्का ! इराणमधील 165 मुलींच्या कबरीचे फोटो ट्विट करत पुतणीनेच दिलं आव्हान

इलाही म्हणाले, "भविष्यात… भारत, चीन रशिया आणि अमेरिका हे जगातील सर्वात शक्तिशाली देश असतील. आणि हे शक्तीशाली देश उभे राहू नयेत यासाठी अमेरिका संघर्ष निर्माण करत आहे. अमेरिकेला आपले वर्चस्व कायम राखायचे असून यामध्ये कोणीही भागीदार नको. शिवाय अमेरिकेचे लक्ष्य हे इराण नाही, तर इराणनंतर अमेरका इतर देशांकडे वळेल.", असंही इलाही यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या आरोपांवर आता अमेरिका नेमका काय खुलासा करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, अमेरिका आणि इस्त्राईलने केलेल्या संयुक्त हल्ल्यात दक्षिण इराणमधील मिनाब शहरात 165 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यामुळे जगभरातून अमेरिका आणि इस्त्राईलवर टीका केली जात आहे. संयुक्त राष्ट्र, नोबेल सन्मान विजेत्या शिक्षण हक्क कार्यकर्त्या मलाला युसूफझाई यांनीही या घटनेचा निषेध केला आहे.

Aftermath of airstrikes in Minab, Iran, highlighting the devastating impact of the Iran Israel war and rising Gulf tensions.
इराणमध्ये 165 शाळकरी मुलींचं एकाच वेळी दफन; JCB ने खोदलेल्या कबरींचे फोटो पाहून जग हादरलं!

निष्पाप नागरिकांना इस्त्राईलकडून जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर या प्रकरणी आंतरराष्ट्रीय पातळीवरून टीका होताच इस्त्रायली लष्कराने आता हात झटकले असून आम्हाला या हल्ल्याबाबत कल्पना नव्हती, असा अजब दावा केला आहे. मात्र, इराणचे परराष्ट्रमंत्री इस्माईल बाघेई यांनी, अमेरिका आणि इस्त्राईल हे दोन्ही देश सातत्यानेशाळा, रुग्णालये, सांस्कृतिक वारसास्थळे आणि उपचार केंद्रांसह निवासी भागाला लक्ष्य करत असल्याचा आरोप केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com