Iran war update : ट्रम्प यांना सर्वात मोठा झटका; आतापर्यंतच्या युध्दात कुणालाच जमलं नाही, ते इराणनं करून दाखवलं...

F35 jet hit iran : अमेरिकेचे सुपर पॉवरफुल फायटर जेट एफ-३५ या विमानाला एखाद्या देशाच्या एअर डिफेन्स सिस्टीमने यशस्वीपणे हिट करण्याची ही पहिलीच घटना असल्याचा दावा केला जात आहे.
F35 jet hit iran
F35 jet hit iranSarkarnama
Published on
Updated on

Iran defense system strength : इराणसोबतच्या युध्दात आपण जिंकलो, त्यांची हवाई सुरक्षा नेस्तनाबूत केली, असा दावा करणाऱे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका बसला आहे. इराण युध्दामध्ये अमेरिकेचे सर्वात अत्याधुनिक आणि सुरक्षित मानले जाणार एफ-३५ स्टील्थ फायटर जेट विमान अपघातग्रस्त झाले आहे. अमेरिकेच्या या विमानाला आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमने हिट केल्याचा दावा इराणने केला आहे.

इराणचा हा दावा ट्रम्प यांच्यासाठी मोठा झटका मानला जात आहे. अमेरिकेच्या विमानाचे मोठे नुकसान झाल्याने त्याचे पश्चिम आशियातील एका अमेरिकन बेसवर इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. विमानाचा पायलट सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, इराणच्या दाव्यामुळे जगात खळबळ उडाली आहे. याचे कारणही तसेच आहे.

अमेरिकेचे सुपर पॉवरफुल फायटर जेट एफ-३५ या विमानाला एखाद्या देशाच्या एअर डिफेन्स सिस्टीमने यशस्वीपणे हिट करण्याची ही पहिलीच घटना असल्याचा दावा केला जात आहे. सर्वात हायटेक विमानालाच इराणने टार्गेट केल्याने अमेरिकेच्या हवाई दलाला हादरा बसला आहे. अमेरिकेकडून अधिकृतपणे इराणचा दावा पूर्णपणे मान्य करण्यात आलेला नाही.

F35 jet hit iran
Ramdas Athawale News : रामदास आठवले नक्की कोणत्या पक्षाचे? केंद्र सरकारच्या वेबसाईटवर धक्कादायक माहिती, पुरावाच आला समोर

इराणने केलेला दावा खरा ठरल्यास अमेरिकेसाठी ही धोक्याची घंटा ठरणार आहे. कारण हा अमेरिकेच्या फायटर जेट-३५ वरील आतापर्यंतच्या युध्दातील पहिला हल्ला ठरू शकतो. असे करणारा इराण हा पहिला देश ठरेल. आतापर्यंत एकदाही या विमानावर हल्ला झालेला नाही. एअर डिफेन्स सिस्टीमला चकमा देणे, हे हायटेक फायटर जेटची ही खासियत आहे. त्यामुळे आतापर्यंत एकदाही या विमानलाही कुणीही हिट करू शकले नाही.

F35 jet hit iran
Modi Shah political strategy : मोदी-शहांचे पुन्हा धक्कातंत्र; मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री बदलणार? घडामोडींना वेग...

इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने एफ-३५ वर हल्ल्याचे फुटेजच जारी करत खळबळ उडवून दिली आहे. मात्र, अद्याप अमेरिकेकडून ते मान्य करण्यात आलेले नाही. अमेरिकी सेंट्रल कमांडचे प्रवक्ते कॅप्टन टिम हॉकिन्स यांनी विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागल्याचे मान्य केले आहे. मात्र, त्याचे नेमके कारण सांगितले नाही. याची चौकशी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com