Political slogan controversy : राहुल गांधींसमोर ‘वोट चोर, गद्दी छोड़’चा नारा, इटलीतील नेत्यावर मेलोनी सरकार भडकले

Giacomo Felibeck, Italy leader, Giorgia Meloni, Italy government, Vote Chori slogan : बर्गामिनी या फोर्जा इटालिया पक्षाच्या परराष्ट्र धोरण प्रमुख आहेत. त्यांचा पक्ष पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या आघाडी सरकारमध्ये आहे.
Giorgia Meloni, PM Modi, Rahul Gandhi
Giorgia Meloni, PM Modi, Rahul GandhiSarkarnama
Published on: 
Updated on: 

Vote Chor Gaddi Chhod controversy : हैदराबाद येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या भारत समिटमध्ये अनेक देशांतील नेते, विविध संस्था-संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. इटलीतील नेते जियाकोमो फेलिबेक यांचाही त्यात समावेश आहे. मात्र, आपल्या भाषणादरम्यान ‘वोट चोर, गद्दी छोड़’चा नारा दिल्याने ते वादात अडकले आहेत. इटली सरकारमधील मंत्र्यांनीच त्यांच्या या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे.

इटलीतील सत्ताधारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्या डेबोरा बर्गामिनी यांनी फेलिबेक यांच्या विधानावर आक्षेप घेतला आहे. लोकशाहीमध्ये आपले म्हणणे मांडण्याचा आणि आरोप करण्याचा अधिकार आहे. मात्र, आरोप करण्याबरोबरच ते सिध्द करण्याची जबाबदारी असायला हवी. भारतासारख्या मोठ्या लोकशाही देशाला यूरोपकडून लोकशाही शिकविण्याची गरज नाही, असे बर्गामिनी म्हणाल्या आहेत.

बर्गामिनी या फोर्जा इटालिया पक्षाच्या परराष्ट्र धोरण प्रमुख आहेत. त्यांचा पक्ष पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या आघाडी सरकारमध्ये आहे. इटलीच्या संसदेत बर्गामिनी या उप प्रतोद आहेत. त्यांच्या पक्षाचे नेते एंटोनियो तायानी हे उपपंतप्रधान आहेत. त्यामुळे बर्गामिनी यांच्या विधानाला महत्व प्राप्त झाले आहे. त्यांची भूमिका ही सरकारची भूमिका म्हणून पाहिले जात आहे.

Giorgia Meloni, PM Modi, Rahul Gandhi
Prakash Solanke news : मोठी बातमी : राष्ट्रवादीच्या आमदाराची निवृत्तीची घोषणा, पुतण्याला विधानसभेची उमेदवारी केली जाहीर

इटली आणि भारत हे विश्वासू सहकारी आहेत. अशा स्थितीत भारतातील अंतर्गत राजकारणावर विदेशी नेत्यांनी टिप्पणी करणे योग्य नाही, अशा शब्दांत बर्गामिनी यांनी कान उपटले आहेत. भारतात जवळपास ९७ कोटी मतदार आहेत. कोणत्याही वादाचा निर्णय भारतातील संस्था आणि न्यायव्यवस्थेच्या प्रक्रियेतून व्हायला हवा, असे बर्गामिनी म्हणाल्या आहेत.

Giorgia Meloni, PM Modi, Rahul Gandhi
शेतकऱ्यांनो, चिमुटभर माती अन् काही सेकंदात रिपोर्ट! शेतातच असे करा माती परीक्षण...

नेमकं काय घडलं?

फिलिबेक यांनी इंडिया समिटमध्ये बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे कौतुक करतानाच भारतातील निवडणूक प्रक्रिया आणि मतदारयाद्यांबाबत काही प्रश्न उपस्थित केले होते. तसेच त्यांनी वोट चोर गद्दी छोड असा नाराही दिला होता. यावेळी राहुल गांधी यांनी टाळ्या वाजविल्या होत्या. त्यावरून भाजपनेही राहुल गांधींवर जोरदार टीका केली होती. आता इटलीतूनही फिलिबेक यांच्या विधानावर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.