Jagdeep Dhankhar Lawyer : उपराष्ट्रपतीपद सोडल्यानंतर जगदीप धनखड पुन्हा वकिलीच्या मैदानात?

After resigning as Vice President, Jagdeep Dhankhar may return to legal practice : राजीनाम्यानंतर सार्वजनिक जीवनापासून दूर असलेले धनखड सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनच्या निवडणुकीत मतदानासाठी उपस्थित; जुन्या पेशाकडे परतण्याचे संकेत
Jagdeep Dhankhar
Jagdeep Dhankharrkarnama
Published on
Updated on

Jagdeep Dhankhar lawyer after resignation : अचानक उपराष्ट्रपती पदावरून पायउतार झाल्यामुळे चर्चेत आलेले भाजपचे जगदीप धनखड आता वकिली करण्याच्या तयारीत आहेत.

वास्तविक आपल्याकडे साध्या नगरसेवकाने देखील कार्यकाळ संपल्यानंतर कधी नोकरी वगैरे केल्याचे दिसत नाही. फार तर हॉटेल किंवा बांधकाम व्यवसायात जम बसवल्याचे दिसते. एकूणच कोणत्याही राजकीय पदावर राहिलेल्या व्यक्ती दुसरा पेशा स्वीकारताना किंवा पूर्वीचा पेशा पुन्हा सुरू करताना क्वचितच दिसतात.

जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) कुठल्या साध्यासुध्या नव्हे तर उपराष्ट्रपती या संविधानिक पदावर होते. त्यांच्या कार्यकाळाची 3 वर्षे त्यांनी पूर्ण केली. गेल्या वर्षी जुलै महिन्यात आपल्या पदाचा राजीनामा दिला. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धनखड यांनी राजीनामा दिला होता, ज्यामुळे अनेकांना आश्चर्चयाचा धक्का बसला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात, त्यांनी आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे आणि डॉक्टरांचा सल्ला पाळण्यासाठी आपण राजीनामा देत असल्याचे कारण दिले होते. मात्र धनखड यांनी दिलेल्या कारणाने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

त्यानंतर राजस्थानमधील चुरु जिल्ह्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. माजी खासदार राम सिंह कसवा आणि आमदार रही कमला कसवा यांच्या घरी ते गेले होते. त्यांचे यावेळी जोरदार स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमात गावातील एका व्यक्तीने त्यांना, तुम्ही दाढी ठेवली नाही असे म्हटले. त्यावर, दाढीवाल्यांची मला भीती वाटते. दाढीवाला दिसला की मी घाबरून जातो, असे धनखड झटकन बोलून गेले. तडकाफडकी उपराष्ट्रपती (Vice President) पदाचा राजीनामा देताना आरोग्याचे कारण दिले पण या वादावर कधीच पडदा पडला नाही. त्यांनी राजीनामा दबावामुळे दिल्याचा आरोप काँग्रेससह (Congress) विरोधकांनी केला होता.

Jagdeep Dhankhar
RSS Mohan Bhagwat : मोहन भागवतांच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी USCIRFची RSSविरोधात मोठी मागणी; राजनैतिक सन्मान न देणे अन् उच्चस्तरीय बैठका टाळा, भारत-अमेरिका संबंधांत नवा वाद

केंद्र सरकारकडून धनखड यांना एक फोन कॉल आल्यानंतर वादविवादाला सुरुवात झाली. मान्सून अधिवेशनात विरोधकांनी न्यायमूर्ती वर्मा यांना हटवण्याविरोधात प्रस्ताव सादर केला होता. धनखड यांनी ती नोटीस स्वीकारली आणि संसद सचिवालयाला कारवाईचे आदेश दिले. यामुळे केंद्र सरकार त्यांच्यावर नाराज झाले, असे विरोधकांचे म्हणणे होते. सकाळी अकरा वाजता अधिवेशनाचे कामकाज सुरू झाले आणि रात्री नऊच्या सुमारास सोशल मीडियावर उपराष्ट्रपती कार्यालयातून त्यांच्या राजीनाम्याची बातमी देण्यात आली. अवघ्या दहा तासांत राजीनामा देण्याचा निर्णय कसा आणि का झाला याबद्दल धनखड स्वतः काहीही बोलले नाहीत.

Jagdeep Dhankhar
Mumbai Police : वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या पत्नीची 1.22 कोटींची फसवणूक; 9 वर्षे सुरू होता कथित प्रकार

सार्वजनिक कार्यक्रमांतून ते दिसले नाहीत. कोणते वक्तव्य नाही की कुठल्या मुद्द्यावर भूमिका मांडताना ते दिसले नाहीत. ते अतिशय खासगी आयुष्य जगत आहेत असे दिल्लीतील त्यांचे निकटवर्तीय सांगतात. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनची निवडणूक पार पडली. त्यावेळी मतदान करण्यासाठी धनखड उपस्थित होते. पूर्वी वरिष्ठ अधिवक्ता म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यानंतर पश्चिम बंगालचे राज्यपाल झाले. अखेर उपराष्ट्रपती झाले. मात्र आता पुन्हा ते बार असोसिएशनचे सदस्य झाले आहेत. यातून धनखड पुन्हा वकिली पेशाकडे वळल्याचे दिसते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com