Hemant Soren-Kalpana Soren : पती मुख्यमंत्री अन् पत्नी आमदार; देशात ‘या’ दोन घटना ठरल्या ऐतिहासिक...

Jharkhand Sikkim Premsingh Tamang Krishna Kumari Rai : सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या पत्नीने राजीनामा दिला आहे.
Kalpana Soren and Premsingh Tamang Family
Hemant Soren and Premsingh Tamang FamilySarkarnama

New Delhi : झारखंडच्या मुख्यमंत्रिपदी हेमंत सोरेन हे गुरूवारी तिसऱ्यांदा विराजमान झाले अन् इतिहास घडला. पती मुख्यमंत्री अन् पत्नी आमदार... हे दृश्य झारखंडच्या विधानसभेत पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. महिनाभरापुर्वी सिक्कीमध्येही इतिहास घडला. पण या दोन्ही घटनांमागचे राजकारण वेगळे असल्याने त्यासाठीही त्याला महत्व प्राप्त झाले आहे.   

हेमंत सोरेन यांनी जेलमधून बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. कथित भूखंड घोटाळाप्रकरणी ईडीने त्यांना जानेवारी महिन्यात अटक केली होती. त्यावेळी चंपई सोरेन यांची या पदावर वर्णी लागली होती. त्यानंतर पोटनिवडणुकीत हेमंत सोरेन यांच्या पत्नी आमदार म्हणून निवडून आल्या.

Kalpana Soren and Premsingh Tamang Family
Rahul Gandhi : राहुल गांधींवर कारवाईचे संकेत मिळताच काँग्रेसचं मोठं पाऊल; काट्याने काटा काढणार...

सोरेन यांची जामीनावर सुटका झाल्यानंतर चंपई सोरेन यांनी बुधवारी पदाचा राजीनामा दिला अन् हेमंत सोरेन यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला. आज त्यांनी पदाची शपथ घेतल्यानंतर हेमंत सोरेन आणि त्यांची पत्न कल्पना सोरेन एकाच विधानसभेत दिसणार आहेत.  

सिक्कीममध्येही घडला इतिहास

सिक्कीम क्रांती मोर्चाने विधानसभा निवडणुकीत राज्यात ऐतिहासिक विजय मिळवला. त्यानंतर पक्षाचे प्रमुख प्रेमसिंग तमांग यांनी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या निवडणुकीत त्यांच्या पत्नी कृष्णा कुमारी राय याही निवडून आल्या होत्या. त्यामुळे ही जोडी विधानसभा गाजवणार असे वाटत होते. पण राय यांनी पतीने शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आमदारकीचा राजीनामा दिला.

Kalpana Soren and Premsingh Tamang Family
K. Keshava Rao : काल काँग्रेसमध्ये घरवापसी, आज खासदारकीचा राजीनामा; केसीआर यांना धक्का...

सामाजिक कामांमध्ये लक्ष देण्यासाठी आमदारकीचा राजीनामा देत असल्याचे राय यांनी स्पष्ट केले होते. तमांग यांनीही राजीनाम्याबाबत स्पष्टीकरण दिले होते. पक्षाकडूनच त्यांना निवडणूक लढण्याचा आग्रह करण्यात आला होता. पक्षाचा आदेश पाळत त्यांनी निवडणूक लढवली. पण आता सामाजिक कामाकडे लक्ष देण्यासाठी राजीनामा दिल्याचे  तमांग यांनी म्हटले होते.

एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या पत्नीची आमदारकीचा राजीनामा अन् दुसरीकडे आमदार पत्नीच्या पतीची मुख्यमंत्रिपदाची शपथ अशा दोन ऐतिहासिक घटना मागील महिनाभरातच भारतीय राजकारणात घडल्या आहेत. सध्यातरी झारखंड विधानसभेत पती-पत्नी जोडी पाहायला मिळणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com