Sudivya Kumar Sonu Passes Away : कॅबिनेट मंत्र्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वृत्त समजताच रुग्णालयात कार्यकर्त्यांसह नेते अन् अधिकारी यांची गर्दी

Hemant Soren Minister Mourns Sudivya Kumar Death : मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख नेते सुदिव्य कुमार सोनू यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
Jharkhand JMM leader Sudivya Kumar death
Jharkhand JMM leader Sudivya Kumar deathsarkarnama
Published on
Updated on

Jharkhand Minister Death News : मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या सरकारमधील कॅबिनेट मंत्री तथा झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख नेते सुदिव्य कुमार सोनू यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ही घटना शनिवारी रात्री उशिरा गिरिडीह येथे घडली असून, यामुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. शनिवारी दिवसभर सुदिव्य कुमार सोनू यांनी शिक्षक दिनाच्या कार्यक्रमासह इतर कार्यक्रमांना उपस्थिती लावली. त्यानंतर रात्री अचानक त्यांची प्रकृती खालावली. ज्यानंतर त्यांना तातडीने गिरिडीह येथील स्थानिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही त्यांना वाचवता आले नाही.

सुदिव्य कुमार यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर रात्रीच रुग्णालयात झारखंड मुक्ती मोर्चाच्या कार्यकर्त्यांसह नेत्यांची गर्दी झाली होती. तसेच अनेक आमदार, माजी आमदार आणि अधिकारीदेखील रुग्णालय परिसरात दाखल झाले होते. यामुळे रुग्णालय परिसरात मोठी गर्दी झाली आहे. सुदिव्य कुमार यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी एक पोस्ट केली आहे. ज्यात त्यांनी, माझे थोरले बंधू, आमचे लाडके सुदिव्य कुमार सोनू जी यांच्या निधनाची दुःखद बातमी कळाली. हे स्वीकारणे माझ्यासाठी अत्यंत कठीण असून, त्यांच्या निधनाने माझ्या आयुष्यात एक अशी पोकळी निर्माण झाली आहे, जी शब्दांत सांगता येणार नाही. ते फक्त माझे सहकारी किंवा राजकीय नेते नव्हते, तर माझ्यासाठी मोठ्या भावासारखे होते. प्रेमळ, मार्गदर्शक आणि प्रत्येक कठीण काळात खंबीरपणे साथ देणारी व्यक्ती होती. त्यांच्यासोबत घालवलेले क्षण आणि त्यांच्याकडून शिकलेले धडे कायम माझ्यासोबत राहतील.

Jharkhand JMM leader Sudivya Kumar death
Hemant Soren and Bihar Election : बिहार निवडणुकीसाठी हेमंत सोरेन घेणार मोठा निर्णय? ; राजद, काँग्रेसचं टेन्शन वाढलं!

झारखंड चळवळीपासूनच ते दिवंगत बाबा डिशोम गुरुजींसोबत पूर्ण निष्ठेने आणि खंबीरपणे उभे राहिले. झारखंड मुक्ती मोर्चाचे एक समर्पित सैनिक म्हणून, त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य झारखंडची ओळख, हक्क आणि आत्मसन्मानासाठीच्या लढ्याला समर्पित केले. झारखंडी अस्मितेप्रती असलेली त्यांची निष्ठा आणि त्यांची लढाऊ वृत्ती नेहमीच स्मरणात राहील.

आज त्यांची आठवण काढताना, आयुष्य किती क्षणभंगुर आहे, हा विचार माझ्या मनात वारंवार येतो. जो आवाज काल आपल्यासोबत होता, तो आता केवळ एक आठवण बनून राहिला आहे. सोनू भैय्या, तुमचे जाणे माझ्यासाठी एक वैयक्तिक नुकसान असून, तुमची आठवण मला नेहमीच येत राहील. तुमचे प्रेम, संघर्ष आणि झारखंडप्रती असलेली तुमची निष्ठा मी आयुष्यभर माझ्यासोबत जपून ठेवीन, असेही मुख्यमंत्री सोरेन यांनी म्हटलं आहे.

Jharkhand JMM leader Sudivya Kumar death
Hemant Soren Decision : महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी वेटिंगवर, तिकडं सोरेन यांचा धडाका सुरू; महिलांना दिलं मोठं गिफ्ट

सुदिव्य कुमार यांची राजकीय कारकिर्द

सुदिव्य कुमार यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात १९८९ मध्ये केली. ते झामुमोचे जिल्हाध्यक्ष होते. त्यानंतर २०१९ मध्ये विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकले. त्यानंतर २०२४ मध्ये दुसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत बाजी मारत ते मंत्री झाले. त्यांच्याकडे नगर विकास आणि गृहनिर्माण, उच्च आणि तंत्रशिक्षण, पर्यटन, कला सांस्कृतिक, क्रीडा आणि युवा कार्य या विभागांची जबाबदारी होती. २०२४ मध्ये त्यांनी भाजपच्या निर्भय शाहाबादी यांचा पराभव केला होता. तर सुदिव्य कुमार यांनी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांच्या गांडेय विधानसभा मतदारसंघातून विजयासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com