

Delhi Political News : कॅनडात जूनमध्ये खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग याच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडाचे संबंध ताणले आहेत. हरदीपच्या हत्येमागे भारत असल्याचा आरोप कॅनडाने केला. यावर भारतानेही पुरावे द्या, हवेत बोलू नका, असे त्यांना खडसावले. त्यानंतर खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंगने पाकिस्तानात जाऊन दहशतवादी कारवायाचे प्रशिक्षण घेतले होते. कॅनडामध्ये तो दशतवाद्याचे कॅम्प चालवीत असल्याचे पुढे आले आहे. त्यावर भारतावर मोठ्या प्रमाणात आरोप करणारे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो गप्प का, असा खडा सवाल विचारला आहे. (Latest Political News)
खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंगने पाकिस्तानात जाऊन दहशतवादी कारवायाचे प्रशिक्षण घेतले होते. त्यानंतर तो गेल्या काही दिवसांपासून खलिस्तानमध्ये दहशतवादासाठी एक कॅम्प चालवत असल्याचे उघड झाले आहे. २०१६ मध्ये भारताने या संबंधात कॅनडाला जागरूक केले होते. मात्र, त्यांच्याकडून याबाबत कुठलीच कारवाई करण्यात आली नव्हती. सुरुवातीच्या काळात हरदीपसिंग हा कॅनडात प्लम्बर म्हणून काम करीत होता, त्यानंतर तो एका गँगस्टारच्या संपर्कात आला. त्यानंतर त्याने कमांडो फोर्स नावाची एक दहशतवादी संघटना स्थापन केली. काही काळ हरदीपसिंग उग्रवादीच्या संपर्कात आला होता. (Maharashtra Political News)
हरदीपसिंगने २०१२ मध्ये पाकिस्तानमध्ये जाऊन काही दिवस त्याने दहशतवादी कारवायांचे ट्रेनिंग घेतले होते. ही ट्रेनिंग पंधरा दिवस चालले होते. या वेळी त्यांनी विविध हत्यारांचा वापर करण्याचे ट्रेनिंग घेतले होते. पाकिस्तानातून आल्यानंतर त्याने दहशतवादी कारवाया करण्यासाठी निधी उभारण्याचे काम केले होते. त्यासाठी त्याने हत्याराची व ड्रगची तस्करी केल्याचे पुढे आले आहे.
पाकिस्तानातील ट्रेनिंगनंतर हरदीपने भारतातील पंजाबमध्ये दहशतवादी हल्ले करण्याचा प्लॅन केला होता. त्यासाठी त्यांनी कॅनडातील काही जणांना हाताशी धरून एक मोठे संघटन उभे केले होते. याबाबत वेळोवेळी भारताकडून कॅनडाला अलर्ट करण्यात आले होते. मात्र, त्यांच्याकडून कुठलीच कारवाई करण्यात आली नसल्याचेही उघड झाले आहे. यावर ट्रुडो शांत बसले आणि आता भारतावर आरोप करतात, असेही खडे बोल कॅनडाला भारताने सुनावले आहेत.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.