Kangana Ranaut : खासदार कंगना यांना वीजबिलाचा झटका; कंपनीकडून पोलखोल, बोलती बंद केली...

Himachal Power Company Responds to Kangana Ranaut Allegation : हिमाचल प्रदेश राज्य विद्युत मंडळाकडून खासदार कंगना रनौत यांचा दावा खोडून काढण्यात आला आहे.
Kangana Ranaut, BJP MP alleging receipt of a ₹1 lakh electricity bill from Himachal Pradesh power authorities.
Kangana Ranaut, BJP MP alleging receipt of a ₹1 lakh electricity bill from Himachal Pradesh power authorities. Sarkarnama
Published on
Updated on

Himachal Pradesh News : हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या खासदार कंगना रनौत वीजबिलाच्या मुद्द्यावरून तोंडावर आपटल्या आहेत. घर बंद असूनही आपल्याला एक लाख रुपये वीजबिल आल्याचा दावा कंगना यांनी केला होता. त्यावरून त्यांनी थेट राज्य सरकारच्या कारभारावर बोट ठेवले होते. पण कंपनीच्या खुलाश्यानंतर त्यांची बोलती बंद झाली आहे.

हिमाचल प्रदेश राज्य विद्युत मंडळाकडून खासदार कंगना यांचा दावा खोडून काढण्यात आला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, कंगना यांना दिलेले बील जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे आहे. तसेच यापूर्वीची थकबाकाही त्यामध्ये समाविष्ट असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कंगना यांनीच याआधी बिल भरले नसल्याचे समोर आले आहे.

Kangana Ranaut, BJP MP alleging receipt of a ₹1 lakh electricity bill from Himachal Pradesh power authorities.
Congress Politics : राहुल गांधींविरोधात काँग्रेसमध्ये गद्दारी! महिला नेत्या सर्वांसमोरच फाडफाड बोलल्या...

कंगना यांनी बुधवारी मंडी मतदारसंघात एका कार्यक्रमादरम्यान बोलताना वीजबिलाचा मुद्दा काढला होता. त्यांचा याबाबतचा व्हिडीओही त्यानंतर सोशल मीडियात व्हायरल झाला होता. त्या म्हणाल्या होत्या की, मनालीतील माझ्या घरासाठी एक लाख रुपये बिल आले आहे. मी तिथे रहात नाही. किती वाईट स्थिती आहे, अशी टीकाही त्यांनी केली होती.

विद्युत कंपनीने कंगना यांच्या दाव्यावर खुलासा करताना सांगितले की, 90 हजार 384 रुपयांचे बिल जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांचे आहे. त्यामध्ये 32 हजार 287 रुपये थकबाकी आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांचे बिल त्यांनी भरलेच नाही. या तीन महिन्यांचे बिल 82 हजार 61 रुपये होते. ते बिल वेळेत भरले नाही, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

Kangana Ranaut, BJP MP alleging receipt of a ₹1 lakh electricity bill from Himachal Pradesh power authorities.
Tahawwur Rana Case : 26/11 च्या मास्टरमाईंडला फासावर लटकवण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल; नरेंद्र मान यांच्या खांद्यावर जबाबदारी

जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे बिल 28 मार्च रोजी भरण्यात आले होते. यादरम्यान त्यांनी 14 हजार युनिट विजेचा वापर केला होता. त्यामुळे त्यांच्या घरामध्ये विजेचा वापर खूप होत होता, हे स्पष्ट झाले आहे. हिमाचल प्रदेशमधील काँग्रेस सरकारकडून दिली जाणारी सबसिटीही खासदार कंगना यांना मिळत आहे. त्यामुळे त्यांना उलट तुलनेने कमी वीजबिल भरावे लागते.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com