
Bangalore Money Laundering Case News : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि इतरांचा समावेश असलेल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणात ईडीने सिद्धरामय्या यांची 300 कोटी रुपये किंमतीच्या १४० हून अधिक स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. तर ही कारवाई मनी लाँड्रिंग प्रकरणात म्हैसूर शहरी विकास प्राधिकरण (MUDA) द्वारे जमीन वाटपातील कथित गैरव्यवहाराप्रकरणी करण्यात आली आहे.
पीटीआयच्या वृत्तानुसार कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि इतरांशी संबंधित मुडा मनी लाँड्रिंग प्रकरणात सुमारे ३०० कोटी रुपयांच्या १४० हून अधिक स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने शुक्रवारी (ता.17) एक निवेदन देत माहिती दिली. म्हैसूर शहरी विकास प्राधिकरण (MUDA) द्वारे जमीन वाटपातील कथित गैर व्यवहार झाला. तर जप्त केलेल्या मालमत्ता वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावावर असून त्या रिअल इस्टेट व्यवसायीक आणि एजंटांच्या नावे आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर राजकीय प्रभावाचा वापर करून म्हैसूर शहरी विकास प्राधिकरणात (MUDA) जमीन वाटपात गैर व्यवहार करण्यात आला. सिद्धरामय्यांनी 3 एकर १६ गुंठे जमिनीच्या बदल्यात त्यांच्या पत्नीच्या नावे १४ जागांसाठी मोबदला मिळवल्याचा आरोप आहे.
दरम्यान, या प्रकरणात कर्नाटक लोकायुक्तांनी मुख्यमंत्र्यांची चौकशी केली आहे. तथापि, मुख्यमंत्री सिद्धरामय्या वारंवार त्यांच्या किंवा त्यांच्या कुटुंबियांचा या प्रकरणात कोणताही हात नसल्याचे म्हटले आहे. तसेच सिद्धरामय्या यांनी विरोधी पक्ष राजकीयदृष्ट्या प्रेरित असून यातूनच आरोप करत असल्याचेही म्हटले आहे.
म्हैसूर शहरी विकास प्राधिकरण (MUDA) ही कर्नाटकची एक राज्यस्तरीय विकास संस्था आहे. या एजन्सीचे काम लोकांना परवडणाऱ्या किमतीत घरे उपलब्ध करून देणे आहे. शहरी विकासादरम्यान ज्यांनी आपली जमीन गमावली त्यांच्यासाठी मुडा ही योजना आहे. या योजनेतून 50:50 टक्के निकषांवर लाभ देणार जाणार आहे. ही योजना कर्नाटक सरकारने 2009 मध्ये आणली मात्र 2020 मध्ये आलेल्या तत्कालीन भाजप सरकारने ही योजना बंद केली.
याअंतर्गत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नी पार्वती यांना फायदा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी 3 एकर 16 गुंठे जमीन देण्याच्या मोबदल्यात १४ जागा पत्नी पार्वतीच्या नावे घ्तल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.