Gram Panchayat Renaming: शेजारच्या राज्यात सरकारचा मोठा निर्णय! ग्रामपंचायतींच्या नावात बदल, आता सर्व ग्रामपंचायतींना मिळणार महात्मा गांधींचे नाव

Karnataka gram panchayat renaming as mahatma gandhi village panchayat : कर्नाटक राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना ‘महात्मा गांधी ग्रामपंचायत’ असे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
State government renames gram panchayats after Mahatma Gandhi
State government renames gram panchayats after Mahatma GandhiSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. कर्नाटक सरकारने राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना ‘महात्मा गांधी ग्रामपंचायत’ असे नाव देण्याचा निर्णय लागू करण्यास सुरुवात केली आहे.

  2. पंचायत राज विभागाने यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केला आहे.

  3. गांधीजींच्या विचारांचे आणि कार्याचे स्मरण कायम ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

Karnataka government latest announcement : कर्नाटक राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना ‘महात्मा गांधी ग्रामपंचायत’ असे नाव देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. पंचायत राज विभागाकडून याबाबतचा आदेश जारी झाला आहे. राष्ट्रपिता गांधी यांच्या विचारांचे आणि कार्याचे स्मरण कायम राहावे, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे पंचायत राज विभागाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, हा निर्णय २०२६-२७ च्या राज्य अर्थसंकल्पातील घोषणेनुसार घेण्यात आला आहे. पंचायत राज आयुक्तालयाने शासनाकडे यासंदर्भात सविस्तर प्रस्ताव सादर केला होता. प्रस्तावाचा अभ्यास केल्यानंतर ग्रामीण विकास व पंचायत राज विभागाने अधिकृत आदेश काढला आहे. शासन आदेशानुसार, राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीच्या नावापुढे ‘महात्मा गांधी’ हे शब्द जोडले जाणार आहेत.

त्यामुळे यापुढे सर्व अधिकृत नोंदी, शिक्के, पत्रव्यवहार, फलक, प्रशासकीय दस्तऐवज आणि ग्रामपंचायतींच्या कार्यालयीन कामकाजात नव्या नावाचा वापर करावा लागणार आहे. संबंधित सर्व विभागांना त्यानुसार आवश्यक बदल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या निर्णयासाठी अर्थ विभाग आणि नियोजन विभागाचीही मंजुरी घेण्यात आली आहे.

State government renames gram panchayats after Mahatma Gandhi
Gram Panchayat Elections : ग्रामपंचायत निवडणुका डिसेंबरअखेर! निवडणूक प्रक्रियाही लवकरच सुरू

अर्थ विभागाने या नामांतरामुळे शासनावर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ग्रामपंचायतींची रचना किंवा प्रशासकीय व्यवस्था बदलत नसून केवळ नावामध्ये बदल केला जात असल्याने विशेष निधीची आवश्यकता भासणार नसल्याचे विभागाने नमूद केले आहे.

नियोजन विभागानेही या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद देताना हा उपक्रम संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांशी सुसंगत असल्याचे मत व्यक्त केले आहे. ग्रामपंचायत ही स्वतंत्र निगमित संस्था मानली जाते. तिला अधिकृत नाव व शिक्का असणे आवश्यक आहे. त्यानुसार राज्य सरकारला ग्रामपंचायतींच्या नावासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

आदेशाची अंमलबजावणी सूचना या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा पंचायतींचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तालुका पंचायतींचे कार्यकारी अधिकारी आणि ग्रामपंचायत विकास अधिकाऱ्यांना आदेश पाठविण्यात आले आहेत. तसेच ग्रामपंचायतींच्या अधिकृत कागदपत्रांमध्ये आणि ई-प्रशासन प्रणालीत आवश्यक बदल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

State government renames gram panchayats after Mahatma Gandhi
Gram Panchayat Fund : तिजोरीत 900 कोटी; पण खर्चच करता येईनात : प्रशासकामुळे गावगाड्यातील कामे खोळंबली, पालकमंत्री तोडगा काढणार...

FAQs :

1. कर्नाटक सरकारने कोणता नवा निर्णय घेतला आहे?

राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना ‘महात्मा गांधी ग्रामपंचायत’ असे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे.

2. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे का?

होय, पंचायत राज विभागाने अधिकृत आदेश जारी करून अंमलबजावणी सुरू केली आहे.

3. हा निर्णय का घेण्यात आला?

महात्मा गांधी यांच्या विचारांचे आणि कार्याचे स्मरण कायम राहावे, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

4. आदेश कोणत्या विभागाने जारी केला?

कर्नाटक पंचायत राज विभागाने हा आदेश जारी केला आहे.

5. या निर्णयाचा ग्रामपंचायतींवर काय परिणाम होणार?

राज्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या अधिकृत नावात ‘महात्मा गांधी’ हा शब्द जोडला जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com