phone tapping : फोन टॅपिंगवरून राजकारण तापलं! मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर जोरदार पलटवार; ‘एकोपा भंग करण्याचा डाव’

karnataka phone tapping row : कर्नाटक सरकारमध्ये फोन टॅपिंगच्या टॅपिंगच्या आरोपांवरून ठिणगी पडली असून मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी विरोधकांच्या आरोपांवर पलटवार केला आहे.
karnataka phone tapping
karnataka phone tappingsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. डी के शिवकुमार यांच्यावर फोन टॅपिंग केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते आर अशोक आणि एच डी कुमारस्वामी यांनी केला.

  2. मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी हे आरोप बिनबुडाचे आणि हताश मनोवृत्तीतील असल्याचे म्हटले.

  3. काँग्रेस सरकारमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारची एकजूट कायम असल्याचे स्पष्ट केले.

Bengaluru News : उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यावर नजर ठेवण्यासाठी फोन टॅपिंग सुरू असल्याचा विरोधी पक्षनेते आर. अशोक आणि केंद्रीयमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याची टीका मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी केली. ही विधाने असंतुष्ट आणि हताश मनोवृत्तीतून आली असल्याचे त्यांनी पुढे म्हटले.

सिद्दरामय्या म्हणाले की, आमचे सरकार सत्तेवर आल्यापासून विरोधी पक्षनेत्यांकडून माझ्या आणि शिवकुमार यांच्या संबंधात फूट पाडण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे. मात्र, आमच्या नात्यावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही.

काँग्रेसमध्ये अंतर्गत लोकशाही असल्याचे स्पष्ट करत त्यांनी म्हटले की, काँग्रेस हा पंतप्रधानांसमोर बोलण्याची हिंमत नसलेल्या भाजपसारखा पक्ष नाही किंवा एका कुटुंबाचे वर्चस्व असलेला धजदही नाही. आमचे सर्व आमदार काँग्रेसचे समर्थक आहेत. वैयक्तिक मत मांडण्याचे स्वातंत्र्य त्यांना आहे; मात्र शेवटी आम्ही सर्व जण पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाला बांधील आहोत, हे आम्ही अनेकदा स्पष्ट केले आहे.

karnataka phone tapping
Phone Tapping Case: खासदार संजय राऊतांची मोठी मागणी; म्हणाले,फोन टॅपिंगप्रकरणी मंत्री बावनकुळेंवर गुन्हा दाखल करा

शिवकुमार हे कट्टर काँग्रेसवादी असून, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून, तुरुंगात टाकूनही त्यांना झुकवता आले नाही, असेही त्यांनी नमूद केले. २००४ ते २०१३ या नऊ वर्षांत राज्याने पाच मुख्यमंत्री पाहिले. तर २०१८ ते २०२३ या पाच वर्षांत तीन मुख्यमंत्री बदलले, याकडे त्यांनी लक्ष वेधले. २०१८ मध्ये कुमारस्वामी मुख्यमंत्री असताना आदिचुंचनगिरीच्या स्वामीजींच्या फोन टॅपिंगचा आरोप झाला होता. त्यावेळी सीबीआयच्या चौकशीत अनेक स्वामीजींचे फोन टॅप झाल्याचे समोर आले होते, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासून तपास यंत्रणांचा वापर राजकीय विरोधकांवर दबाव आणण्यासाठी होत असल्याचा आरोप करत सिद्धरामय्या म्हणाले, ‘पोलिस, सीबीआय, ईडी, प्राप्तीकर विभागांचा गैरवापर होत असल्याची चर्चा देशभर आहे. अशा धमक्यांना आम्ही झुकणार नाही.

karnataka phone tapping
Phone Tapping Case : महाराष्ट्रात पुन्हा एकदा ‘फोन टॅपिंग’? ; माजी गृहमंत्र्यांचा खळबळजनक दावा...

FAQs :

1. फोन टॅपिंगचा आरोप कोणी केला?
विरोधी पक्षनेते आर अशोक आणि केंद्रीयमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी आरोप केले.

2. आरोप कोणावर आहेत?
उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्यावर नजर ठेवण्यासाठी फोन टॅपिंग होत असल्याचा दावा करण्यात आला.

3. मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांची प्रतिक्रिया काय होती?
त्यांनी हे आरोप बिनबुडाचे आणि हताश मनोवृत्तीतील असल्याचे सांगितले.

4. या वादाचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
कर्नाटकात सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

5. काँग्रेस सरकारमध्ये फूट आहे का?
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की त्यांच्या आणि शिवकुमार यांच्या नात्यावर कोणताही परिणाम होणार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com