Karnataka SIR : काँग्रेसशासित राज्यातच SIR प्रक्रियेदरम्यान 1 कोटी मतदारांना वगळलं : अंतिम मतदार यादी जाहीर

Karnataka Final Voter List : SIR प्रक्रियेदरम्यान, कर्नाटकातील ५२ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण १२७ मतदारांना गैरभारतीय नागरिक म्हणून चिन्हांकित करण्यात आले आहे. राजकीय संशोधन संस्था 'संकल्प'ने संकलित केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.
Karnataka SIR | Final Voter List | 99 Lakh Names Removed
Karnataka SIR | Final Voter List | 99 Lakh Names RemovedSarkarnama
Published on: 
Updated on: 

Karnataka final voter list : कर्नाटकातील विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षणाची (SIR) प्रक्रिया पूर्ण झाली असून, निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादी जाहीर केली आहे. या यादीत राज्यातील ४ कोटी ५५ लाख ११ मतदारांची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, SIR प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी कर्नाटकात ५ कोटी ५४ लाख ३२ हजार ३१४ मतदार होते. त्याच्या तुलनेत अंतिम मतदार यादीत तब्बल ९९ लाख ३२ हजार ३०३ मतदारांची घट झाली आहे.

दुसरीकडे, प्रारूप मतदार यादीच्या तुलनेत अंतिम यादीत ८ लाख ६४ हजार मतदारांची वाढ झाली आहे. अंतिम मतदार यादीतील आकडेवारीनुसार, राज्यात २ कोटी २५ लाखांहून अधिक पुरुष आणि २ कोटी २९ लाखांहून अधिक महिला मतदार आहेत. याशिवाय २ हजार ८४१ तृतीयपंथी मतदारांची नोंद करण्यात आली आहे.

नवमतदारांच्या दृष्टीनेही ही यादी महत्त्वाची ठरली आहे. १८ ते १९ वयोगटातील ६ लाख ८३ हजारांहून अधिक मतदारांचा अंतिम यादीत समावेश आहे. तर ८५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ मतदारांची संख्या ३ लाख ९२ हजारांहून अधिक आहे. तर SIR प्रक्रियेदरम्यान प्रारूप मतदार यादी तयार करताना १ कोटी ७ लाखांहून अधिक मतदारांची नावे वगळण्यात आली होती.

Karnataka SIR | Final Voter List | 99 Lakh Names Removed
Pune Police : पुणे पोलिसांनी विद्यानंद बापटांसह 'या' व्यक्तींचे पोलीस संरक्षण काढलं : लक्ष्मण हाकेंच्या संरक्षणाबाबतही मोठा निर्णय

यामध्ये स्थलांतरित झालेले किंवा पडताळणीदरम्यान ज्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, अशा ८० लाख ६२ हजार मतदारांचा समावेश होता. याशिवाय १६ लाख ३९ हजार मृत मतदारांची नावे, सात लाखांहून अधिक दुबार नोंदी आणि अन्य कारणांमुळे ३ लाख ८३ हजार मतदारांची नावे यादीतून कमी करण्यात आली होती.

विशेष म्हणजे, स्थलांतरामुळे किंवा पत्ता शोधता न आल्याने ज्यांची नावे वगळण्यात आली होती, अशा मतदारांना पुन्हा नाव नोंदवण्यासाठी फॉर्म क्रमांक ६ भरावा लागणार होता. या प्रक्रियेदरम्यान नव्या मतदारांसह एकूण ७ लाख ८७ हजार ५३४ अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे प्राप्त झाले. या अर्जांची पडताळणी केल्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली.

Karnataka SIR | Final Voter List | 99 Lakh Names Removed
Nagpur MLC Results : मतमोजणीवेळी मीडिया सेंटरमध्ये मोबाइल, लॅपटॉप बंदी : नागपूर विभागीय आयुक्तांचा फोनही बंद; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

कर्नाटकातील SIR प्रक्रियेदरम्यान, राज्यातील ५२ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण १२७ मतदारांना गैरभारतीय नागरिक म्हणून चिन्हांकित करण्यात आले आहे. राजकीय संशोधन संस्था 'संकल्प'ने संकलित केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. दरम्यान, मतदार यादीतून नावे वगळण्यासाठी दाखल करण्यात येणाऱ्या अर्जांची प्रक्रिया आणि त्यातील पारदर्शकतेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com