Kerala CM : महाराष्ट्राची रणनीती आखणारा नेता बनणार केरळचा मुख्यमंत्री; राहुल गांधींनी दिल्या शुभेच्छा...

Ramesh Chennithala Likely Chief Minister : केरळच्या मुख्यमंत्रि‍पदी रमेश चेन्निथला यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे. शिवाय केरळमधील सत्तास्थापनेत्या निमित्ताने रमेश चेन्निथला यांची राहुल गांधी यांच्यासोबत एक बैठक झाली. या बैठकीत राहुल गांधी यांनी चेन्निथला यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Ramesh Chennithala
Ramesh Chennithala meets Rahul Gandhi after Kerala election victory, sparking strong buzz around Kerala CM news and leadership decision.Sarkarnama
Published on
Updated on

Kerala CM News : केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसप्रणीत आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. बहुमत मिळाल्यानंतर केरळमध्ये सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असून केरळचा आगामी मुख्यमंत्री कोण असणार याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.

अशातच आता केरळच्या मुख्यमंत्रि‍पदी रमेश चेन्निथला यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे. केरळमधील सत्तास्थापनेत्या निमित्ताने रमेश चेन्निथला यांची राहुल गांधी यांच्यासोबत एक बैठक झाली. या बैठकीत राहुल गांधी यांनी चेन्निथला यांना शुभेच्छा दिल्याची माहिती समोर आली आहे.

त्यामुळे आता केरळच्या मुख्यमंत्रि‍पदी चेन्निथलाच विराजमान होणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. तर राहुल यांच्यासोबतच्या बैठकीनंतर चेन्निथला तिरुवनंतपुरमकडे रवाना झाले आहेत. दरम्यान, केरळच्या मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांचंही नाव चर्चेत होतं.

Ramesh Chennithala
TVK Vijay government : राजकीय धमाका; काँग्रेसकडून अधिकृत घोषणा, लोकसभा-राज्यसभेचंही प्लॅनिंग सांगितलं, महत्वाची अट ठरणार गेमचेंजर

मात्र, आता राहुल गांधी यांनी चेन्निथला यांना शुभेच्छा दिल्यामुळे केरळचे आगामी मुख्यमंत्री कोण होणार याबाबतच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. तसंच चेन्निथला हे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रा काँग्रेसची जबाबदारी असेलेला नेता केरळचा आगामी मुख्यमंत्री होणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com