KPSC recruitment irregularities : KPSC भरतीत कथित गैरव्यवहार; कुमारस्वामींची प्रियांक खर्गेंच्या राजीनाम्याची मागणी

CID probes alleged KPSC recruitment irregularities as Kumaraswamy demands Priyank Kharge’s resignation : परीक्षेची कागदपत्रे, OMR शीट आणि CCTV फुटेजमधील कथित अनियमिततेचा CID तपास; ‘बळ्ळारी चलो’वरून शिवकुमारांचा भाजपवर पलटवार
Kumaraswamy Vs Priyank Kharge
Kumaraswamy Vs Priyank KhargeSarkarnama
Published on
Updated on

KPSC recruitment controversy : केपीएससीच्या पशुवैद्यकीय अधिकारी भरती परीक्षेतील कथित गैरव्यवहाराचा सीआयडीकडून तपास सुरू आहे. परीक्षेची कागदपत्रे आणि ‘ओएमआर शीट’ हाताळण्यात झालेल्या कथित अनियमितता तसेच अधिकारी आणि इतर संबंधित व्यक्तींच्या भूमिकेची चौकशी करण्यात येत आहे.

याच प्रकरणावरून धर्मनिरपेक्ष जनता दल आणि केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी काँग्रेस नेते गृहमंत्री प्रियांक खर्गे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

मागील सिद्धरामय्या सरकारमध्ये काँग्रेस (Congress) प्रियांक खर्गे यांच्याकडे ग्रामीण विकास आणि पंचायत राज खाते असताना केपीएससीमार्फत 24 सहायक कार्यकारी अभियंत्यांच्या नियुक्तीला परवानगी दिल्याचा आरोप कुमारस्वामी यांनी केला आहे. ‘ओएमआर शीट’मध्ये कथित फेरफार, सीसीटीव्ही फुटेज गायब होणे आणि नियुक्ती प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन झाल्याबाबत अंतिम निवडीपूर्वीच केपीएससीमध्ये आक्षेप नोंदविले होते. तरीही या नियुक्त्या केल्याचा आरोप कुमारस्वामी यांनी केला आहे.

दरम्यान, काँग्रेस सरकारच्या कथित भ्रष्टाचाराच्या विरोधात भाजपने (BJP) सुरू केलेल्या ‘बळ्ळारी चलो’ पदयात्रेवरही मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी जोरदार टीका केली. ही पदयात्रा म्हणजे भाजपमधील अंतर्गत गटबाजी संपवून पक्षाला एकत्र आणण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला.

Kumaraswamy Vs Priyank Kharge
DK Shivakumar cabinet : शिवकुमार सरकारला मोठा धक्का; अवघ्या 25 दिवसांत बी. नागेंद्र यांचा राजीनामा

भाजपमधील अंतर्गत भांडणे आणि गटबाजी संपवून पक्षाचे पुनर्गठन करण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्या पदयात्रेला उत्तर म्हणून आमच्याकडेही एक यात्रा करण्याची योजना आहे. भाजपने त्यांची यात्रा करू द्यावी. आमची यात्रा काय असेल, याची माहिती लवकरच देऊ. भाजप काहीही बोलत राहील आणि आम्ही गप्प बसू असे होणार नाही, असे शिवकुमार म्हणाले.

Kumaraswamy Vs Priyank Kharge
RSS Mohan Bhagwat : मोहन भागवतांच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी USCIRFची RSSविरोधात मोठी मागणी; राजनैतिक सन्मान न देणे अन् उच्चस्तरीय बैठका टाळा, भारत-अमेरिका संबंधांत नवा वाद

कर्नाटक महर्षी वाल्मिकी अनुसूचित जमाती विकास महामंडळातील कोट्यवधींच्या कथित अपहारप्रकरणी आरोप झाल्यानंतर मंत्री बी. नागेंद्र यांनी स्वेच्छेने राजीनामा दिला आहे. आम्ही काहीही केले, तरी भाजपचे समाधान होणार नाही. कारण ते स्वतः अनेक घोटाळ्यांमध्ये सहभागी आहेत. आम्हाला राज्याचा विकास करायचा आहे. विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यातच वेळ वाया घालवायचा नाही, असे शिवकुमार यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com