

New Delhi News : लिबियामधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सुमारे 42 वर्षे देशावर हुकुमशाही पध्दतीनं राज्य केलेल्या माजी नेत्याच्या मुलाला निर्घृणपणे संपवलं आहे. हल्लेखोरांनी घरात घुसून बेधुंद गोळीबार करत लिबियाचे माजी हुकूमशाह मुअम्मर गद्दाफी यांचा मलगा सैफ-अल-इस्लाम गद्दाफी यांची गोळ्या घालून हत्या केली आहे. या घटनेनं लिबियामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
लिबियात मुअम्मर गद्दाफी यांची 1969 ते 2011 पर्यंत सत्ता होती. मात्र, 2011 मध्ये झालेल्या लिबिया जनतेच्या मोठ्या जनतेच्या बंडानंतर गद्दाफी यांच्या राजवट संपुष्टात आली. तर मुअम्मर गद्दाफी यांचा मुलगा सैफ अल इस्लाम यांच्यावर सरकारविरोधी निदर्शने दडपण्याचा गंभीर आरोप असून याप्रकरणी त्यांनी 6 वर्षांसाठी तुरुंगवासाची शिक्षाही भोगली आहे.
अज्ञातांकडून हत्या करण्यात आल्यानंतर सैफ अल-इस्लाम यांच्या कार्यालयानं एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. या निवेदनात घरात घुसत चार अज्ञात बंदूकधाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात 53 वर्षीय सैफ अल-इस्लाम यांचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं आहे. गोळीबारानंतर हे हल्लेखोर तिथून पळून जाण्यात यशस्वी झाल्याचंही समोर येत आहे.
सैफ अल-इस्लाम यांच्या निर्घृण हत्येबाबत गद्दाफी कुटुंबाने माहिती देताना म्हटलं आहे की, सैफ हे त्यांच्या बागेत असताना त्यांना हल्लेखोरांनी गोळ्या घालून मारलं. यानंतर घटनास्थळावरून हे सर्व हल्लेखोर पसार झाले. सैफ अल इस्लाम हे मुअम्मर गद्दाफी यांचे उत्तराधिकारी मानले जात होते.
सैफ अल-इस्लाम यांनी लिबियाच्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहितीही अल अरेबिया या वृत्तसंस्थेनं दिली आहे. सैफ अल इस्लाम यांनी आजपर्यंत कोणतंही मोठं अधिकृत पदाची जबाबदारी सांभाळली नसली तरी वडील मुअम्मर गद्दाफी यांच्या चार दशकांच्या सत्ताकाळात देशातील सर्वात ताकदवान नेते म्हणून ओळखले जात होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.