Lok Sabha argument : ऐयाशी, गद्दारी..! भाजप खासदाराने लोकसभेत 'त्या' पुस्तकांचा उल्लेख करताच काँग्रेस खवळले; वर्षा गायकवाडांसह अनेकांची अध्यक्षांकडे धाव...

Nishikant Dubey statement : लोकसभेचे कामकाज तहकूब झाल्यानंतर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सत्ताधारी व विरोधी खासदारांना दालनात बोलविले होते.
Om Birla office clash
Om Birla office clashSarkarnama
Published on
Updated on

Parliament Session update : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यानंतर पहिलल्या दिवसापासूनच सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांविरोधात आक्रमक दिसून आले. प्रामुख्याने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माजी लष्कर प्रमुखांच्या अप्रकाशित पुस्तकाचा लोकसभेत उल्लेख केल्यानंतर हा वाद सुरू झाला. आता हा वाद टोकाला गेल्याचे आजच्या घडामोडींवरून स्पष्ट झाले.

राहुल गांधी यांच्याकडून सलग दोन दिवस माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांच्या पुस्तकाचा संसदेत उल्लेख करण्यात आला. मात्र, त्यातील मजकूर वाचण्यास लोकसभा अध्यक्षांनी मनाई केली. त्यावरून काँग्रेस खासदार आक्रमक झाले होते. त्यातच आज भाजपचे खासदार निशीकांत दुबे यांनी राहुल गांधी यांच्यावर पलटवार करताना जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्याशी संबंधित वादग्रस्त पुस्तके लोकसभेत आणली.

दुबे यांनी प्रत्येक पुस्तक संसदेत दाखवत त्यात नेमके काय आहे, याचा ओझरता उल्लेख केला. यावेळी त्यानी नेहरू-एडविना पुस्तकाचा उल्लेख करताना ऐयाशी, गद्दारी सारख्या काही वादग्रस्त शब्दांचा वापर केला. त्यावरून काँग्रेसचे खासदार प्रचंड आक्रमक झाले. काही खासदारांनी तालिका अध्यक्षांच्या दिशेने कागद फेकले. तालिका अध्यक्षांकडून वारंवार दुबे यांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण ते थांबले नाहीत. अखेर अध्यक्षांनी पाच वाजेपर्यंत कामकाज तहकूब केले.

Om Birla office clash
Rahul Gandhi News : राहुल गांधींनी केंद्रीय मंत्री असलेल्या जुन्या दोस्ताला तोंडावरच म्हटले गद्दार; मैत्रीचा हात पुढे केला पण...

लोकसभेचे कामकाज तहकूब झाल्यानंतर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सत्ताधारी व विरोधी खासदारांना दालनात बोलविले. मात्र, याठिकाणीही काँग्रेसचे खासदार प्रचंड आक्रमक झाल्याचे दिसले. निशीकांत दुबे यांना लोकसभेत का बोलू दिले, यावरून काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला होता. याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.   

Om Birla office clash
Local body election Punjab : हायकोर्टाकडून 100 हून अधिक नगरपरिषदांच्या निवडणुकांना स्थगिती; नेमकं काय घडलं?

दरम्यान, आज सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतरही काँग्रेसने आक्रमकपणे घोषणाबाजी केली. नवरणे यांचे अप्रकाशित पुस्तक, काँग्रेसच्या आठ खासदारांचे निलंबन आणि अन्य मुद्द्यांवरून विरोधकांनी गोंधळ सुरू केला. त्यामुळे सुरूवातीला बारा वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आले. त्यानंतर केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी विरोधकांच्या गदारोळातच भारत व अमेरिकेतील व्यापार करारावर निवेदन दिले. विरोधक शांत न झाल्ये अध्यक्षांनी दोन वाजेपर्यंत कामकाज तहकूब केले. त्यानंतर दुबे यांच्या विधानांमुळे पुन्हा काँग्रेस खासदारीं जोरदार घोषणाबाजी केल्याने कामकाज पाच वाजेपर्यंत तहकूब करावे लागले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com