Assembly Elections 2024 : निवडणुकीच्या आधीच भाजपचे आठ उमेदवार विजयी, 'या' राज्यात सत्ता मिळणार?

BJP Political News :अरुणाचल विधानसभेसाठी 60 जागांवर, तर लोकसभेसाठी दोन जागांवर 19 एप्रिलला मतदान होणार आहे.
BJP
BJPSarkarnama
Published on
Updated on

Arunachal Pradesh Assembly Elections 2024 : लोकसभेसोबतच अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीसाठी 19 एप्रिलला मतदान होणार आहे. मात्र, मतदानाच्या आधीच भाजपचे आठ उमेदवार विजयी झाले आहेत. आठ मतदारसंघांत भाजपच्या उमेदवारांच्या विरोधात विरोधी पक्षाला उमेदवारच देता आले नाही. त्यामुळे भाजपचे आठ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.

BJP
Lok Sabha Election 2024 : बिहारमध्ये ‘इंडिया’वर शिक्कामोर्तब; लालूंचाच दबदबा, कुणाला किती जागा?

अरुणाचल विधानसभेसाठी (Arunachal Pradesh Assembly) 60 जागांवर तर लोकसभेसाठी दोन जागांवर मतदान होणार आहे. विधानसभेत भाजपचे आठ उमेदवार बिनविरोध विजयी झाल्याने पेमा खांडू सलग पाचव्यांदा मुख्यमंत्री बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. लोकसभेमध्येदेखील भाजपच्या (BJP)उमेदवारांची बाजू भक्कम वाटत आहे.

‘हे’ आठ उमेदवार विजयी

मुख्यमंत्री पेमा खांडू, हेज अप्पा, मुच्छू मिठी, एर रतु टेची, तेची कासो, जिक्के ताको, न्यातो दुकोम, दसांगलू पुल हे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. दसांगलू पूल अंजाव जिल्ह्यातील आयर्न लेडी म्हणून ओळखला जातो.

लोकसभेच्या रिंगणात 15 उमेदवार

विधानसभेच्या आठ जागा बिनविरोध विजयी झाल्या आहेत. मात्र, लोकसभेच्या दोन जागांसाठी तब्बल 15 उमेदवार रिंगणात आहेत. विधानसभा आणि लोकसभेसाठी 19 एप्रिलला मतदान होणार आहे. अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 2 जूनला, तर लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जूनला जाहीर होणार आहेत.

R

BJP
Ramtek Lok Sabha Constituency : आमदार काँग्रेसचा, उमेदवारी शिवसेनेकडून, पुढाकार भाजपचा; अन् आता भाजप नेते गायब !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com