

Jyotiraditya Scindia CBI probe : साताऱ्यातील मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये २०२४ मध्ये मोठा आर्थिक घोटाळा समोर आला होता. याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला असून सीबीआयकडून चौकशी आहे. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे बुधवारी व्यक्त केली होती. त्यानंतर आता थेट केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले आहे.
काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे?
सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियात पोस्ट करत म्हटले होते की, सातारा येथे मुख्य पोस्ट ऑफिस कार्यालयात एप्रिल २०२४ मध्ये आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आला होता. याबाबत सीबीआय चौकशी करण्यात आली होती. यानंतर ८० ते ९० खातेदारांचा क्लेम तयार करण्यात आला होता.
काहींच्या सह्या जुळत नाहीत म्हणून त्यांचे क्लेम ऑगस्ट २०२४ साली फॉरेन्सिक डिपार्टमेंटला पाठविण्यात आले होते. यातील तब्बल १५ ते २० जणांचे क्लेम अद्याप खातेदारांना मिळाले नाहीत. ते सर्वजण कार्यालयात चकरा मारत आहेत. या सर्वांचे क्लेम तातडीने मिळणे आवश्यक आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई अपेक्षित आहे. माझी शासनाला विनंती आहे की, हा पोस्टाच्या सेवांच्या विश्वासार्हतेचा विषय असून आपण कृपया आपण याची गांभीर्याने नोंद घ्यावी, अशी अपेक्षा खासदार सुळेंनी व्यक्त केली होती.
ज्योतिरादित्य शिंदेंचे स्पष्टीकरण
सुप्रिया सुळे यांच्या या पोस्टवर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सोशल मीडियातूनच स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, सातारा हेड पोस्ट ऑफिसमधील या प्रकरणाची आम्ही अत्यंत गांभीर्याने दखल घेतली आहे आणि तत्परतेने व जबाबदारीने कार्यवाही केली आहे. तात्काळ विभागीय चौकशी सुरू करण्यात आली असून, हे प्रकरण सीबीआयकडे पाठविण्यात आले आहे. एफआयआर नोंदवण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे.
दावे योग्य प्रकारे प्रक्रिया केले जात आहेत. आवश्यक तेथे फॉरेन्सिक पडताळणी केली जात आहे, जेणेकरून केवळ वैध दावेच निकाली काढले जातील. टपाल सेवांची विश्वासार्हता जपणे, हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे आणि त्यामुळेच ही कार्यवाही वेगवान, सुव्यवस्थित आणि कोणतीही तडजोड न करता करण्यात आली आहे, असे शिंदेंनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.