Mamata Banerjee news : मी हे कधीच सांगितलं नाही, भाजपचे अध्यक्ष माझ्याकडे मदत मागायचे! पहिल्याच आंदोलनात ममता बॅनर्जींचा मोठा गौप्यस्फोट

Mamata Banerjee statement, TMC latest news : लढू किंवा मरू, असे म्हणत ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील भाजप सरकारला आव्हानही दिले आहे.
Mamata Banerjee
Mamata BanerjeeSarkarnama
Published on
Updated on

West Bengal politics : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांचे भाचे खासदार अभिषेक बॅनर्जी, खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावरील हल्ला तसेच इतर मुद्द्यांवरून आज त्या कोलकाता येथे धरणे आंदोलन करत आहेत. यावेळी बोलताना ममतांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे.

ममता बॅनर्जी यांच्या आंदोलनासाठी पक्षाचे खासदार-आमदारांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित आहेत. राज्यातील सत्ता गेल्यानंतर त्यांचे हे पहिले आंदोलन आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या आंदोलनाकडे लागले आहे. यावेळी बोलताना अभिषेक बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्याचा उल्लेख करत त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.

ममतादीदी म्हणाले, ज्या लोकांनी कधीकाळी माझ्याकडे मदत मागितील होती, त्यांनी अभिषेक यांच्यावर हल्ल्यावेळी आमचे समर्थन केले नाही. भाजपचे अध्यक्ष अनेकदा फोन करून माझी मदत मागत होते. पण मी ही बाब कधी मीडियाला सांगितली नाही. भाज सोडून सर्व राजकीय पक्षांशी माझे चांगले संबंध आहे. पण जेव्हा कधी भाजपने मदत मागितील, मी मदत केली. त्यांच्या वाईट काळात त्यांना सहकार्य केले. मी त्यांना वैयक्तिक फोनही केले होते, असे ममता म्हणाल्या आहेत.

Mamata Banerjee
Cockroach Janata Party news : कॉक्रोच जनता पार्टीचा सरकारने घेतलाय धसका; महाराष्ट्र पोलिसांची एक कृती अन् केंद्रीय मंत्र्यांची पोस्ट चर्चेत

लढू किंवा मरू, असे म्हणत ममता बॅनर्जी यांनी भाजप सरकारला आव्हानही दिले. त्या म्हणाल्या, त्यांची इच्छा असेल तर मला अटक करावी. कोलकाता मध्ये आंदोलनाची परवानगी दिली नाही तर मी दिल्लीत जाईन. बंगालमध्ये पोलीस पक्षाच्या नेत्यांना धमकी देत आहेत. माझ्या कार्यकाळात मी सर्व लोकांसोबत उभी होते. तेव्हा विचारधारेचा विचार केला नाही.

Mamata Banerjee
BJP Politics : एकही निवडणूक न जिंकलेल्या नेत्यामुळे भाजपमध्ये भूकंप; पक्ष फुटण्याची भीती, खुद्द अमित शाह मैदानात?

पक्षाचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी आमदार रितब्रत बॅनर्जी यांच्यावर टीका करताना त्यांचा चोर असा उल्लेख केला. बनावट सही प्रकरणावरून पक्षाने रितब्रत यांना बडतर्फ केले आहे. याअनुषंगाने बोलताना कल्याण बॅनर्जी म्हणाले, तृणमूल काँग्रेसच्या तिकीटावर तुम्ही लढला. ममता बॅनर्ती यांच्या आशीर्वादामुळे तुम्ही जिंकला. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा जिंकून दाखवा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com