TMC News: फासे पलटले..? ममता बॅनर्जींचा सर्वात मोठा विजय, उच्च न्यायालयाचा टीएमसीच्या बंडखोर गटाला दुहेरी धक्का, थेट नियुक्त्याच रद्द

Trinamool Congress News: पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तब्बल 15 वर्षे सत्तेत राहिलेला टीएमसी पक्ष फुटला होता. माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सत्ता गमावण्यासोबतच पक्षात उभी फूट असा दुहेरी धक्का सहन करावा लागला होता.
Mamata Banerjee
Mamata Banerjeesarkarnama
Published on: 
Updated on: 

West Bengal News: पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तब्बल 15 वर्षे सत्तेत राहिलेला टीएमसी पक्ष फुटला होता. माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सत्ता गमावण्यासोबतच पक्षात उभी फूट असा दुहेरी धक्का सहन करावा लागला होता. यानंतर पश्चिम बंगाल विधानसभेचे अध्यक्ष (स्पीकर) यांनी फुटीर गटाचे प्रमुख ऋतब्रत बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, आता कोलकाता उच्च न्यायालयानं बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेतेपदी झालेली नियुक्तीच थेट रद्द केली आहे.

कोलकत्ता उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता.27 नोव्हेंबर) तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर आमदारांच्या गटाला (डेमोक्रॅटिक टीएमसी) दुहेरी दणका दिला. यात उच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांनी 3 जून 2026 रोजी ऋतब्रत बॅनर्जींची पश्चिम बंगाल विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड आणि तृणमूल काँग्रेसच्या मुख्य प्रतोदपदी अखरुज्जमान यांच्या नियुक्तीचा निर्णयही रद्द केला.

उच्च न्यायालयाने यावेळी पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाबाबत विधानसभा अध्यक्षांनी पुढील 10 दिवसांच्या आत पुनर्विचार करून निर्णय घ्यावा, असे निर्देशही दिले आहेत. न्यायालयाने दिले आहेत.

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीतील सत्तांतरानंतर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या पक्षातील नेते शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेद्वारे त्यांनी पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी प्रतिस्पर्धी तृणमूल काँग्रेस गटाचे नेते ऋतब्रत बॅनर्जी यांची नियुक्ती करण्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयालाच आव्हान दिले होते.

Mamata Banerjee
Uddhav Thackeray shivsena : इंडिया आघाडीच्या बैठकीआधीच 'मविआ'त मोठा ट्वीस्ट! राष्ट्रवादीच्या पावलावर उद्धव ठाकरेंच्या सेनेचे पाऊल; विधेयकाबाबत वेट अँड वॉचची भूमिका घेत काँग्रेसचे वाढवले टेन्शन!

कोलकाता उच्च न्यायालयात शोभनदेव चट्टोपाध्याय यांच्या याचिकेवर सुनावणी पार पडली. या सुनावणीनंतर न्यायालयाने हा निर्णय दिला. भाजपने विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर 6 मे 2026 रोजी तृणमूल काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती. शोभनदेव चट्टोपाध्याय यांच्या नावावर विरोधी पक्षनेतेपदासाठी या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले होते. या बैठकीला रितब्रत बॅनर्जी यांच्यासह तृणमूल काँग्रेसचे सुमारे 70 नेते उपस्थित असल्याचं याचिकेत म्हटलं आहे.

मात्र, तृणमूल काँग्रेसच्या तत्कालीन सदस्यांनी 19 मे 2026 रोजी त्यांच्या स्वाक्षरी केलेला ठराव विधानसभा अध्यक्षांकडे पाठवण्यात आला. या ठरावाद्वारे शोभनदेव चट्टोपाध्याय यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्याच्या निर्णयाची माहिती देण्यात आली होती. तसेच 6 मे रोजी झालेल्या बैठकीला उपस्थित असलेल्या सदस्यांची उपस्थिती नोंदवहीही सादर करण्यात आली होती.

Mamata Banerjee
Delimitation bill 2026 : मोदी सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत; कोणत्या राज्यात किती जागा वाढणार?

याचदरम्यान, तृणमूल काँग्रेस पक्षात उभी फूट पडली. यानंतर ऋतब्रत बॅनर्जी यांनी थेट शोभनदेव चट्टोपाध्याय यांच्या नियुक्तीविरोधात विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत या ठरावावरील अनेक स्वाक्षऱ्या बनावट असल्याचा आरोपही करण्यात आला होता. यानंतर अध्यक्षांनी तत्कालीन तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्याविरोधात स्वाक्षऱ्यांमध्ये फेरफार केल्याच्या आरोपाचा ठपका ठेवत पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.