Mamata Banerjee New Party Name : ममता बॅनर्जींच्या पक्षाला नवे नाव, चिन्ह; फुटीर गटाचेही चिन्ह ठरले! निवडणूक आयोगाकडून मान्यता

Mamata TMC New Party Symbol : ममता बॅनर्जी यांना निवडणूक आयोगाने नवे चिन्ह दिले आहे. तसेच त्यांच्या गटाला नवीन नाव देखील देण्यात आले आहे.
Mamata TMC New Party  Name & Symbol
Mamata TMC New Party Name & SymbolSarkarnama
Published on
Updated on

Mamata Banerjee New Party News : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडली. अरूप रॉय यांच्या सोबत मोठ्या संख्येने आमदार गेले. त्यांनी मूळ पक्षावर दावा सांगितला. तर, पक्षाच्या संस्थापक अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी देखील पक्षावरील दावा कायम ठेवला. दरम्यान, याबाबत निवडणूक आयोग आणि कोर्टात दावा दाखल आहे. पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही गटांना नवीन नाव आणि चिन्ह देण्यात आले आहे.

ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसला 'ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस' हे नाव आणि 'फुटबॉल खेळाडू' हे चिन्ह देण्यात आले असून, त्यांना पश्चिम बंगाल, मेघालय आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये मान्यताप्राप्त राजकीय पक्ष म्हणून दर्जा देण्यात आला आहे.

अरूप रॉय यांच्या नेतृत्वाखालील गटाला 'डेमोक्रॅटिक तृणमूल काँग्रेस' हे नाव आणि 'लिफाफा' हे चिन्ह देण्यात आले आहे. त्यामुळे आता दोन्ही गट नवीन नाव आणि चिन्हासह निवडणुकीला सामोरे जाणार आहेत.

Mamata TMC New Party  Name & Symbol
TMC Symbol Dispute : शिवसेना-राष्ट्रवादीनंतर TMC; राहुल गांधींनी सांगितला पक्षफोडीचा 'पॅटर्न'; भाजपसह निवडणूक आयोगावर केले गंभीर आरोप

निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांना तीन नावांचा पर्याय दिला होता. त्यातून त्यांनी ममता तृणमूल काँग्रेस हा पर्याय निवडला, तर, दुसऱ्या गटाला नॅशनलिस्ट तृणमूल काँग्रेस पार्टी,डेमोक्रेटीक तृणमूल काँग्रेस आणि वेस्ट बंगाल तृणमूल काँग्रेस असे तीन पर्याय दिले होते. त्यातून त्यांनी डेमोक्रेटीक तृणमूल काँग्रेस हे नाव निवडले.

पश्चिम बंगालमधील नंदिग्राम आणि रेजीनगर या दोन विधानसभांमध्ये पोटनिवडणूक होत आहे. सहा ऑक्टोबरला येथे मतदान होणार आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना आपल्या पक्षाचे नाव आणि चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवावे लागणार आहे.

Mamata TMC New Party  Name & Symbol
TMC Name Symbol Dispute : ममता बॅनर्जींना सर्वात मोठा धक्का; निवडणूक आयोगानं तृणमूल काँग्रेस पक्षाचं नाव अन् चिन्ह गोठवलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com