काँग्रेसचे आणखी एक माजी मुख्यमंत्री पक्ष सोडण्याच्या वाटेवर

त्यांना फोडण्याची जबाबदारीही राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या संस्थेवर असल्याचे समजते.
Mukul Sangma
Mukul Sangma
Published on
Updated on

नवी दिल्ली : काँग्रेसची डोकेदुखी कमी होण्याऐवजी आता वाढतच चालली आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तर गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनी बुधवारी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आता आणखी एक माजी मुख्यमंत्री काँग्रेसला रामराम करण्याच्या वाटेवर आहेत. विशेष म्हणजे त्यांना फोडण्याची जबाबदारीही राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या संस्थेवर असल्याचे समजते.

गोव्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते लुईजिन्हो फेलेरो (Luizinho Faleiro) यांनी बुधवारी कोलकता येथे तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) प्रवेश केला. त्यांच्यासोबत गोव्यातील काँग्रेसच्या काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह नऊ जण तृणमूलमध्ये दाखल झाले आहेत. फेलेरो यांनी काँग्रेस सोडण्यात राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा मोठा हात असल्याचा खुलासा फेलेरो यांनीच केला आहे.

Mukul Sangma
सहकारी महिलेवर बलात्कार करणाऱ्या हवाई दल अधिकाऱ्याचे कोर्ट मार्शल

पंजाबमधील राजकीय संकट अद्याप संपलेले नाही. अमरिंदरसिंग हे पक्ष सोडण्याच्या निर्णयावर ठाम असून पुढील आठवड्यात नवी पक्षाची घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यातच आता काँग्रेसला मेघालयमधून धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मेघालयचे माजी मुख्यमंत्री मुकूल संगमा बाहेर पडण्याच्या वाटेवर असल्याचे समजते. प्रशांत किशोर यांच्या संस्थेतील सदस्य त्याबाबत संगमा यांच्याशी चर्चा करत आहेत. ते सध्या मेघालय विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत.

संगमा यांना फोडण्याची जबाबदारी तृणमूल काँग्रेसनेच किशोर यांच्या संस्थेला दिल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यामुळे गोव्यातील माजी मुख्यमंत्र्यांना फोडल्यानंतर आता मेघालयातील माजी मुख्यमंत्र्यांसाठी तृणमूलने फासे टाकले आहेत. अद्याप संगमा यांनी तृणमूलच्या ऑफरचा स्वीकार केलेला नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमा हे खासदार विन्सेन्ट पाला यांना प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त केल्यापासून नाराज आहेत.

Mukul Sangma
अमरिंदरसिंगांच्या पत्नीचाच काँग्रेस सोडण्यास नकार

दरम्यान, मागील काही दिवसांपासून प्रशांत किशोर हे काँग्रेसच्या जवळ गेल्याचे मानले जाते. त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह राहुल व प्रियांका गांधी यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या राजकीय चर्चाही रंगल्या होत्या. त्यातच फेलेरो यांनी तृणमूलमध्ये जाण्यापूर्वी किशोर यांची भेट झाल्याचा गौप्यस्फोट गुरूवारी केला होता. आता संगमा यांच्याशीही किशोर यांच्या टीमचीच चर्चा सुरू असल्याचे समोर आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com